शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

रॅम्पवरून घसरून पडताहेत प्रवासी

By admin | Updated: June 11, 2014 01:33 IST

प्लॅटफार्म क्रमांक ४-५ वर जाण्यासाठी खाली उतरत असलेल्या आणि गुळगुळीत झालेल्या रँपवरून मंगळवारी सायंकाळी अनेक पुरुष आणि महिला प्रवासी घसरून पडल्या.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : डोक्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता
नागपूर : प्लॅटफार्म क्रमांक ४-५ वर जाण्यासाठी खाली उतरत असलेल्या आणि गुळगुळीत झालेल्या रँपवरून मंगळवारी सायंकाळी अनेक पुरुष आणि महिला प्रवासी घसरून पडल्या. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर टाकूनही सायंकाळपर्यंत कुठलीच उपायययोजना न करण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या घसरण्याचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४-५ वर जाण्यासाठी खाली उतरण्यासाठी रँपची सुविधा रेल्वे प्रशासनाने करून दिलेली आहे. परंतु रँपवर लावण्यात आलेली टाईल गुळगुळीत झाल्यामुळे यावरून अनेक प्रवासी घसरून खाली पडत आहेत. पूर्वेकडील भागातून आणि पश्चिमेकडून प्लॅटफार्म क्रमांक ४-५ वर जाण्यासाठी प्रवासी या रँपवरून खाली उतरतात. अनेकदा गाडी सुटण्याची वेळ झाल्यामुळे काही प्रवासी गडबडीत रँपवरून खाली उतरतात. परंतु गुळगुळीत झालेल्या या रँपवरून अनेक प्रवासी खाली पडत होते. यात काही ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिलांचाही समावेश होता. सायंकाळी ६ वाजता अनेक प्रवासी या रँपवरून पडले. त्या ठिकाणी उपस्थित रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तातडीने ही माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाच मिनिटासाठी आपला एक कर्मचारी घटनास्थळी पाठविला. परंतु त्यानेही हा रँप वाहतुकीसाठी बंद न करता तेथून निघून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत प्रवाशांचे घसरून पडण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत किती दक्ष आहे, याची प्रचिती आली. एखाद्या प्रसंगी गडबडीत गाडी पकडण्याच्या उद्देशाने डोक्याच्या भागावर एखादा प्रवासी पडल्यास त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)