शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोे रेल्वेला नासुप्रचे बूस्ट !

By admin | Updated: March 12, 2015 02:33 IST

नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी बुधवारी २०१५-१६ चा ८३० कोटी २८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

नागपूर : नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी बुधवारी २०१५-१६ चा ८३० कोटी २८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात मेट्रो रेल्वेला चालना देण्यासह मेट्रो रिजन व अविकसित ले-आऊटच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. नागपूरकरांसाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वेसाठी वर्धने यांनी अर्थसंकल्पात १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.या तरतुदीमुळे येत्या काळात मेट्रोरेल्वेच्या कामाची गती वाढण्याचे सिग्नल मिळाले आहेत. तर नागपूर मेट्रो रिजनसाठीही ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने शहराच्या बाह्य भागातही नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे.नासुप्रचा गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प ८१२ कोटींचा होता. यावर्षी त्यात १८ कोटींची भर पडली. अपेक्षित उत्पन्नात भांडवली जमा ४२०.६४ कोटी, महसुली जमा ३३२.७५ कोटी तसेच अग्रिम व ठेवी जमाचे ७५.७५ कोटी रुपयांचा समावेश आहे. या एकूण उत्पन्नापैकी तब्बल ८२६.२९ कोटी रुपयांचा भांडवली व महसुली खर्च गृहित धरण्यात आला आहे. वर्धने यांनी अर्थसंंकल्पात नासुप्रतर्फे यापूर्वी हाती घेण्यात आलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला असून काही प्रकल्प सार्वजनिक खासगी सहभागातून पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी नासुप्र ही नोडल एजंसी आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कंपनीने सादर केलेला डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) नासुप्रने २८ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्य शासनाला सादर केला होता. राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ रोजी त्याला मंजुरी दिली. पाठोपाठ २१ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारनेही मंजुरी देत केंद्रीय अर्थसंकल्पात १४४ कोटींची तरतूद केली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनी लि.’ची स्थापना करण्यात आली असून राज्य सरकारने व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पावर ८६८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १३ मार्च रोजी दिल्ली येथे नवनियुक्त मेट्रो रेल कॉर्पोरेशनची बैठक होत आहे. तीत या प्रकल्पाची पुढील दिशा निश्चित होईल. मेट्रो रेल्वे प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करायचा आहे. प्रकल्पासाठी खासगी जागेची फारशी गरज नसल्यामुळे भूसंपादनातही अडचणी येणार नाहीत, त्यादिशेने वेगात काम सुरू असल्याचा दावा सभापती श्याम वर्धने यांनी केला.(प्रतिनिधी)