शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रोरिजन’चे नाव दलालांचा साधतोय डाव !

By admin | Updated: February 18, 2015 02:41 IST

मेट्रो रिजनच्या नावावर (नागपूर महानगर क्षेत्र विकास योजना) नासुप्रकडून अधिकृतरीत्या मंजूर न करून घेतलेल्या ले-आऊटमधील भूखंड बेधडकपणे विकले जात आहेत.

लोकमत विशेषकमलेश वानखेडे नागपूरमेट्रो रिजनच्या नावावर (नागपूर महानगर क्षेत्र विकास योजना) नासुप्रकडून अधिकृतरीत्या मंजूर न करून घेतलेल्या ले-आऊटमधील भूखंड बेधडकपणे विकले जात आहेत. ले-आऊटचा ‘सबमिशन मॅप’ दाखवून भूखंडांची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे यासाठी होर्डिंग्ज, फ्लेक्स, वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या जात आहेत. मात्र, या जाहिरातींची सत्यता पडताळून कारवाई करण्यासाठी नासुप्रची यंत्रणा पुढाकार घेताना दिसत नसल्यामुळे ले-आऊट विक्रेत्यांसह दलालांची चांदी होत आहे. संबंधित भूखंड खरेदी करणाऱ्या नागरिकांना मात्र भविष्यात त्यांचे भूखंड नियमित करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शहरात भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शहरापासून काही अंतरावर कमी किमतीत एखादा प्लॉट खरेदी करावा, भविष्यात मुलाबाळांच्या कामी येईल, असा विचार प्रत्येकाचा मनात येतो. अशातच नागपुरातील रस्त्यांवर, उंच इमारतींवर, वृत्तपत्रातही मेट्रोरिजन अंतर्गत माफक दरात प्लॉट खरेदी करण्याच्या जाहिराती दिसतात आणि आपणही लगेच ‘बुकिंगसाठी’ सरसावतो. येथेच अनेकांची फसगत होत आहे. मेट्रोरिजनमधील भूखंडांच्या मंजुरीची नासुप्रमध्ये जाऊन पडताळणी न करता नागरिकही अनधिकृत भूखंड खरेदी करीत आहेत. राज्य शासनाने २ सप्टेंबर २०१० रोजी अधिसूचना प्रसिद्ध करीत नासुप्रला मेट्रो रिजन अंतर्गत येणाऱ्या भागासाठी विकास नियोजन प्राधिकरण नेमले होते. त्यावेळी या अधिसूचनेचा आधार घेत नागपूरकरांना मेट्रोरिजनची स्वप्ने दाखवून नागपूरपासून १५ ते २० किलोमीटर अंतरापर्यंत भूखंड विकण्यात आले होते.