शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

 नागपुरात  ८० च्या वेगात धावली मेट्रो रेल्वे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:54 PM

महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देदर १५ मिनिटात फेरी : अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोतर्फे बुधवारी वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० च्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना जॉय राईड करण्यात आली. रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज येथून निघाल्यानंतर काही वेळ वेग कमी होता, नंतर वेग वाढून ट्रॅकवर वेगात धावली.अजनी मेट्रो स्टेशन ते रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनपर्यंत वळण मार्ग असल्यामुळे वेग कमी झाला होता. पण वर्धा रोडवर पोहोचल्यानंतर जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनपर्यंत रेल्वेचा वेग सरासरी प्रति तास ६५ ते ७० होता. या प्रकारे सीताबर्डी ते जयप्रकाशनगरपर्यंतचा प्रवास केवळ ११ ते १२ मिनिटात पूर्ण केला. प्रवासानंतर पत्रकारांनी जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन आणि सुविधांची पाहणी केली.मेट्रो हाऊसमध्ये पत्रपरिषदेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. रेल्वे प्रति तास ८० च्या वेगाने धावत आहे. याकरिता अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टमचा अवलंब केला आहे. यामुळे काही जागा वगळता उर्वरित ठिकाणांवर सिंग्नल लावावे लागले नाहीत. सेक्शनमध्ये रेल्वेला थांबविण्याची गरज नाही. अपघाताची शक्यता नाही.या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.आठवड्यात सरासरी चार हजार प्रवासीमार्च २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत मेट्रो रेल्वेत प्रवासाचा लोकांचा कल वाढत आहे. दीक्षित म्हणाले, शनिवार आणि रविवारला १२ हजार आणि आठवड्यात सरासरी दररोज चार हजार लोक प्रवास करीत आहेत. हा आकडा भविष्यात वाढणार आहे.फीडर बससेवा १३ मार्गावर निश्चितमेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना ने-आण करण्यासाठी फीडर बससेवेचे १३ मार्ग ठरले आहेत. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनकरिता फीडर बससेवा म्हाळगीनगर ते हिंगणापर्यंतच्या मार्गावर चालविण्याचा प्रस्ताव आहे. याप्रकारे मेट्रो स्टेशनलगतच्या भागासाठी ई-रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सरकार बदलण्याचा प्रकल्पावर परिणाम नाहीदीक्षित म्हणाले, लोकशाहीत निवडणुका होतात. सरकार बदलतात. अशास्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलण्याचा प्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही. हिंगणा-सीताबर्डी मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर