शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेमुळे उद्योजकांना फायदा होणार

By admin | Updated: August 13, 2015 03:41 IST

परिवर्तन व जीवनशैली सुधारणार : व्हीआयएच्या संवाद कार्यक्रमात बृजेश दीक्षित यांची माहिती

नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर नागपुरात परिवर्तन घडून येण्यासह लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीत निश्चितच सुधारणा होणार आहे. हा प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल आणि स्थानिक उद्योजकांसाठी कामाच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी येथे दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) एकॉनॉमिक व फायनान्स फोरमच्या वतीने बुधवारी उद्योग भवनातील सभागृहात ‘नागपूर मेट्रोमुळे नागपुरात परिवर्तन आणि स्थानिक उद्योजकांना संधी’ या विषयावर आयोजित संवाद कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून दीक्षित बोलत होते. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उपाध्यक्ष अनिल पारेख, सचिव रोहित अग्रवाल, व्हीआयएच्या एकॉनॉमिक व फायनान्स फोरमचे चेअरमन ओ.एस. बागडिया, आशिष बुधे आणि ‘एनएमआरसीएल’चे उपमहाव्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर होते. (प्रतिनिधी)८६८० कोटींची गुंतवणूकबृजेश दीक्षित म्हणाले, केंद्र सरकार, राज्य सरकार, मनपा आणि नासुप्रचा सहभाग असलेला हा प्रकल्प ८,६८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. रस्त्याच्या मध्य भागात उभारण्यात येत असल्यामुळे जमीन अधिग्रहणासाठी अडथळा येणार नाही. प्रकल्पासाठी ८७ हेक्टर जमिनीची गरज असून, त्यापैकी ७५ हेक्टर जमीन पूर्वीच मिळाली आहे, शिवाय कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे फ्रान्स, युरोपियन युनियन आणि जर्मनी या देशातील बँकांनी प्रकल्पासाठी कर्ज देण्याची तयारी दाखविली आहे. एकूण प्रकल्पाच्या किमतीपैकी ४,५०० कोटींचे कर्ज उपरोक्त बँकांकडून मिळेल, असा विश्वास आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. हा प्रकल्प हिंगणा व मिहान या परिसरापर्यंत जाणार आहे. निविदेद्वारे मेट्रो रेल्वेच्या कामाचा अनुभव असलेल्यांना काम मिळेल, पण छोटी-मोठी कामे स्थानिक कंपन्यांना निश्चितच मिळेल. यासाठी कंपन्यांना गुणवत्तेवर भर द्यावा लागेल. मेट्रो रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या वेळात तब्बल दीड तासांची बचत होणार आहे. त्यामुळे त्यांची क्षमता वाढेल. मुंजे चौक आयकॉनिक ठरणारडॉ. सुमंत देऊळकर यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले की, पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेचे क्रॉसिंग सीताबर्डी येथील मुंजे चौकात राहणार आहे. या चौकात जमिनीपासून २० मीटर उंच टॉवर आणि स्टेशन बांधण्यात येणार आहे. तिथे अत्याधुनिक सुविधा राहणार असल्यामुळे मुुंजे चौक नागपूरचे आयकॉन ठरेल. या चौकाचे डिझाईन तयार करण्यासाठी आयोजित स्पर्धेत जागतिक दर्जाच्या २४ कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यातून काही कंपन्यांची डिझाईन तयार करण्यासाठी निवड करण्यात येणार आहे.