नागपुरात पर्यावरण संवर्धनाचा असाही संदेश ! अधिकारी व कर्मचारी सायकलने पोहोचले कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 20:07 IST2017-12-02T19:47:47+5:302017-12-02T20:07:49+5:30
पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच इंधनाची बचत व्हावी यासाठी वित्त व लेखा सेवा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर न करता सायकलने कार्यालयात येऊन पर्यावरण वाचविण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे.

नागपुरात पर्यावरण संवर्धनाचा असाही संदेश ! अधिकारी व कर्मचारी सायकलने पोहोचले कार्यालयात
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच इंधनाची बचत व्हावी यासाठी वित्त व लेखा सेवा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर न करता सायकलने कार्यालयात येऊन पर्यावरण वाचविण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे.
लेखा व कोषागारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजता सायकलने कार्यालयात आपली उपस्थिती नोंदविली. सिव्हील लाईन्स परिसरातील लेखा व कोषागारे विभागाच्या लेखा कोष भवन येथे सहसंचालक विजय एन. कोल्हे, तसेच जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखा अधिकारी अर्चना सोळंकी यांचेसह सुमारे २५ अधिकारी व कर्मचारी सायकल संदेश अभियान सहभागी झाले होते.
प्रदूषणच्या समस्येमुळे राजधानीसारख्या शहरात निर्माण झालेली परिस्थिती तसेच इंधनाची बचत व शारीरिक सुदृढता यासाठी सायकल चालविणे हाच एकमेव पर्याय असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा यादृष्टीने वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून सायकलने कार्यालयात पोहचण्याचा निर्णय घेतला. सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळी १० वाजता विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारे येथील कार्यालयात सायकलने पोहचल्यानंतर आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात केली.
सायकल चालवा व पर्यावरण वाचवा यासाठी लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे, सहायक सहसंचालक शुभदा चिंचोळकर, एफडीसीएमचे सहायक संचालक प्रशांत ठावरे, जिल्हा नियोजन कार्यालयाचे लेखा अधिकारी अर्चना सोळंकी, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या लेखा अधिकारी वर्षा हेजिप त्यांच्यासोबत वर्षा सहारे, नीलेश माळी, प्रियंका पाठे, क्षितिज काळे, पंकज उबाळे, अशोक भजणे, स्वप्नील चौधरी, सचिन पाटील, शैलेश कोठे, आशिष जाधव, सतीश हिंगणे, सर्वश्री थोरात, वाघुडकर, वासनिक, अरोंधेकर, हेडाऊ, तिळकणे आदी कर्मचारी सायकल चालवा व पर्यावरण वाचवा यामध्ये सहभागी झाले होते.