मेघनाद बोधनकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 06:23 IST2021-03-15T06:21:31+5:302021-03-15T06:23:08+5:30

मेघनाद यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सात वाजता त्यांच्या वसंतनगर येथील पत्रकार काॅलनीतील निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच दुपारी चार वाजता त्यांची अन्त्ययात्रा निघेल आणि अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्य संस्कार होतील.

Meghnad Bodhankar passed away | मेघनाद बोधनकर यांचे निधन

मेघनाद बोधनकर यांचे निधन

नागपूर- विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे वरिष्ठ संपादक, लोकमत टाईम्सचे सल्लागार संपादक आणि हितवादचे माजी संपादक मेघनाद बोधनकर यांचे रात्री  साडे अकराज्या सुमारास निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर जामठा येथील सीएमसी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात डाॅ. पाठक यांच्या नेतृत्वात उपचार सुरू होते. त्यांच्यापश्चात पत्नी आशादेवी, दोन पुत्र सुमित आणि अमित असा मोठा परिवार आहे.

मेघनाद यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सात वाजता त्यांच्या वसंतनगर येथील पत्रकार काॅलनीतील निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच दुपारी चार वाजता त्यांची अन्त्ययात्रा निघेल आणि अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्य संस्कार होतील.
 
Web Title: Meghnad Bodhankar passed away