तीन रुग्णांच्या जीवासाठी रात्रभर जागे होते मेडिकल

By सुमेध वाघमार | Published: April 3, 2024 08:43 PM2024-04-03T20:43:05+5:302024-04-03T20:43:30+5:30

 शेतमजुर वडीलाचा पुढाकार : २३ वर्षीय मुलीचे केले अवयवदान.

Medical was awake all night for the life of three patients |  तीन रुग्णांच्या जीवासाठी रात्रभर जागे होते मेडिकल

 तीन रुग्णांच्या जीवासाठी रात्रभर जागे होते मेडिकल

 नागपूर : २३ वर्षीय मुलीचे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे समजताच तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांच्या समुपदेशनानंतर शेतमजुर असलेल्या वडिलांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला आणि मंगळवारी रात्री ९ ते बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत मेडिकलशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिघांना जीवनदान देण्यासाठी जागे होते. यावेळी अधिष्ठात्यांपासून ते वैद्यकीय अधीक्षक आणि इतरही वरीष्ठ डॉक्टर उपस्थित होते.

मध्यप्रदेशातील २३ वर्षीय मुलीची अचानक प्रकृती खालवली.  तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. सलग ९ दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. उपचाराला प्रतिसाद देत नसल्यचे पाहत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. अर्चना अहेर, डॉ. सचीन कांबळे, डॉ. संजय रामटेके व डॉ. राज कोंडावार यांनी तिला तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. याची महिती तिच्या कुटुंबियांना दिली.  तिचे ४६ वर्षीय वडील, ४० वर्षीय आई व २० वर्षीय भाऊ आणि इतरही नातेवाइक उपस्थित होते. ‘सुपर’चे डॉ.सुनील वाशिमकर, डॉ. सुमीत चाहाकर, भाग्यश्री निघोट यांनी त्यांना अवयवदानाविषयी माहिती दिली. शेतमजुर असलेले तिच्या वडीलांनी वेळ मागितला. मुलीच्या अवयवाची राख करण्यापेक्षा इतरांना जीवनदान देण्याची गोष्ट त्यांना पटली. त्यांनी मुलीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. 

-एक महिला, दोन पुरुषाना नवे जीवन
‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांनी प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले. परंतु रात्रीचे ९वाजले होते. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांच्या पथकाने अवयव काढण्याला सुरुवात केली. तर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या ३३ वर्षीय तरुणीवर किडनी प्रत्यारोणासाठी दुसºया डॉक्टरांच्या टिमने तयारी केली. बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्या रात्रीच दुसरी किडनी एका खासगी हॉस्पिटलमधील ५५ वर्षीय पुरुषाला तर लिव्हर त्याच खासगी हॉस्पिटलमधील ६५ वर्षीय पुरुषाला दान करण्यात आले. कॉर्निआ मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला दान करण्यात आले.

Web Title: Medical was awake all night for the life of three patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर