जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्याचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:38 IST2018-12-15T20:37:57+5:302018-12-15T20:38:33+5:30
जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्या एका वाहनचालकाला अज्ञात वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. शुक्रवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळच्या कंटेनर डेपोजवळ हा भीषण अपघात घडला.

जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्याचा अपघातात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्या एका वाहनचालकाला अज्ञात वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. शुक्रवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळच्या कंटेनर डेपोजवळ हा भीषण अपघात घडला.
रंगलाल सहदेव पटेल (वय ४०) आणि जानेंद्र श्रीबुद्धसेन पटेल (वय ३०, रा. ग्राम बरिगमा, ता. चैराहट, जि. सिद्धी मध्य प्रदेश) हे काका पुतणे शुक्रवारी वाहन घेऊन नागपुरात आले होते. कंटेनर डेपोजवळ त्यांनी वाहन लावल्यानंतर जेवणाचे पार्सल विकत घेण्यासाठी ते बाहेर गेले. रात्री १० ते १०.३० च्या सुमारास रंगलाल पटेल पार्सल घेऊन जात असताना कंटेनर डेपोजवळ त्यांना एका वाहनचालकाने जोरदार धडक मारली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जानेंद्र पटेल यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे.