एमबीबीएस विषय वगळले, उत्तराकरिता शेवटची संधी; सरकारला १३ मार्चपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:32 IST2026-02-14T17:29:46+5:302026-02-14T17:32:06+5:30

Nagpur : एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमातून महत्त्वाचे पाच विषय वगळण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकार व इतर प्रतिवादींना यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून १३ मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली.

MBBS subject dropped, last chance to answer; Government has till March 13 | एमबीबीएस विषय वगळले, उत्तराकरिता शेवटची संधी; सरकारला १३ मार्चपर्यंत मुदत

MBBS subject dropped, last chance to answer; Government has till March 13

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमातून महत्त्वाचे पाच विषय वगळण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकार व इतर प्रतिवादींना यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून १३ मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली.

प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. अंडरग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमातून रेस्पिरेटरी मेडिसीन, फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन, इमर्जन्सी मेडिसीन, डेंटिस्ट्री व रेडिएशन ऑन्कोलॉजी हे पाच विषय वगळले आहेत. त्यामुळे इंडियन चेस्ट सोसायटी व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

ऑफ आधीच्या मेडिकल कौन्सिल इंडियानुसार एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाकरिता हे पाचही विषय बंधनकारक होते. ८ ऑगस्ट २०१९ पासून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागेवर नॅशनल मेडिकल कमिशन कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर अंडरग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने संबंधित विषयांना अभ्यासक्रमातून वगळले. हा निर्णय मनमानी, घटनाबाह्य व अन्यायकारक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.
 

Web Title : एमबीबीएस विषय हटाए: जवाब के लिए अंतिम मौका; सरकार को समय सीमा।

Web Summary : बॉम्बे हाई कोर्ट ने सरकार को एमबीबीएस पाठ्यक्रम से पांच प्रमुख विषयों को हटाने के संबंध में जवाब देने के लिए 13 मार्च तक का समय दिया है। मेडिकल एसोसिएशन ने इस निर्णय को मनमाना और असंवैधानिक बताया है।

Web Title : MBBS subjects removal: Last chance for reply; Govt gets deadline.

Web Summary : Bombay High Court grants government until March 13 to respond regarding the removal of five key subjects from the MBBS curriculum, a decision challenged by medical associations as arbitrary and unconstitutional.

टॅग्स :nagpurनागपूर