शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एमबीसीसीएसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांची फसवणूक

By योगेश पांडे | Updated: August 24, 2023 18:08 IST

आणखी एक वैद्यकीय प्रवेशाचे रॅकेट ? : कन्सल्टन्सी सुरू करून गोरखधंदा

नागपूर : एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली एका कन्सल्टन्सीच्या माध्यमातून एका फार्मसी मालकाची ८ लाखांनी फसवणूक करण्यात आली. यामागे वैद्यकीय प्रवेशाचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील संदीप बंडावार (५३) असे फसवणूक झालेल्या फार्मसी मालकाचे नाव आहे. त्यांचा मुलाला परदेशातून एमबीबीएसचे शिक्षण घ्यायचे होते. २०१७ साली त्यांना नागपुरात इन्फिनिटी एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश होतात अशी माहिती मिळाली. त्यांनी तेथे जाऊन रवी राजेश बोरकर (दयालू सोसायटी, जरीपटका) याची भेट घेतली. त्यांच्यात चर्चा झाली व नंतर रवी संदीप यांना चामोर्शीत जाऊन भेटला. १६ लाखांत प्रवेश होईल व त्यातच पाच वर्षांचे शिक्षण होईल, असा दावा रवीने केला.

संदीप यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याला चेक तसेच रोखीच्या माध्यमातून ८ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर रवीने प्रवेशाबाबत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने त्यांची भेट घेण्याचेच टाळले. संदीप अनेकदा त्याच्या घरी गेले. मात्र दरवेळी तो बाहेर असल्याचेच कारण सांगण्यात यायचे. त्यांच्या मुलाचा प्रवेश अखेरपर्यंत झालाच नाही. अखेर संदीप यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी रवीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात उघडकीस आले होते मोठे रॅकेट

तीन वर्षांअगोदर नागपुरात एमबीबीएस प्रवेशाचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. सीबीआयने कारवाई करत नागपुरातील परिमल कोतपल्लीवार याच्या संस्थेवर छापेदेखील टाकले होते. नीटमध्ये कमी गुण मिळाल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा यासाठी पैसे मोजायला तयार असतात. यातूनच अनेकदा त्यांची फसवणूक करण्यात येते. नागपुरातदेखील विशिष्ट पॅकेजमध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याचे दावे काही खाजगी संस्थांकडून करण्यात येतात हे विशेष.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीStudentविद्यार्थीnagpurनागपूर