शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

 नागपूर एमआयडीसीतील हत्याकांडाची मास्टरमाइंड नात गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:28 IST

Nagpur News एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी तनु काळे हिला तिच्या प्रियकरासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले. मृत विजयाबाई यांची तनु ही नात होय.

ठळक मुद्देगुन्हेशाखेची अमरावतीत कारवाई प्रियकरासह पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी तनु काळे हिला तिच्या प्रियकरासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले. मृत विजयाबाई यांची तनु ही नात होय.

 विजयाबाई एसआरपीएफच्या निवृत्त कर्मचारी होत्या. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून तिघांचेही लग्न झाले आहे. हे तिघेही नागपुरातच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिवारासह राहतात. वृद्ध विजयाबाई सप्तक नगरात एकट्या राहायच्या. त्यांच्या मुलीची मुलगी तनू स्वैर वागत होती. तिने आपल्या आईवडीलांचे घर सोडले होते. ती मित्रांसोबत राहायची. अधूनमधून आजी विजयाबाई यांच्याकडे यायची. आजी निवृत्त सरकारी कर्मचारी असल्याने तिच्याकडे १० ते १५ लाख रुपये आणि दागिने असल्याचा अंदाज मिनुने बांधला होता. ती एकटीच असल्याने तिचा गेम करून रोकड तसेच दागिने लुटता येईल, आजूबाजूला सीसीटीव्ही वगैरे काही नसल्याने आपले पाप कुणाच्या लक्षात येणार नाही, असे तनूला वाटत होते. आपले अवाजवी खर्च भागविण्यासाठी आजीची हत्या करण्याचा कुविचार तिच्या मनात आला. त्यानुसार तिने प्रियकर फैजानच्या मदतीने कट रचला. त्यात फैजानचे साथीदार नीलेश प्रकाश पौनीकर, बाबा उर्फ कदिर खान, फरदीन खान आणि आरजू उर्फ मोहम्मद कमरे आलम यांना सहभागी करून घेतले. १० ते १५ लाख रुपये मिळणार म्हणून आरोपी त्यात सहभागी झाले आणि गुरुवारी मध्यरात्री त्यांनी विजयाबाईच्या गळ्यावर गुप्तीचे घाव घालून त्यांची हत्या केली.

पोलिसांनी शनिवारी रात्री बाबा, नीलेश पौनिकर आणि फरदीन खान तसेच आरजूला पकडले. तर रोकड, दागिन्यांसह पळून गेलेल्या तनू आणि तिचा प्रियकर फैजानला अमरावतीला सोमवारी पहाटे ताब्यात घेतले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी