ढाबा व्यावसायिकाची निर्घुण हत्या, पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 14:17 IST2020-02-25T12:48:37+5:302020-02-25T14:17:55+5:30
याबाबत वृत्त असे की, वडांबा येथिल रहिवासी प्रकाश बालगोविंद जैस्वाल यांचा नागपूर-जबलपूर

ढाबा व्यावसायिकाची निर्घुण हत्या, पोलिसांकडून तपास सुरू
नागपूर (देवलापार): येथुन जवळच असलेल्या वडांबा येथील रहिवासी प्रकाश बालगोविंद जैस्वाल (५३) वर्षे यांची आज पहाटेच्या सुमारास हत्त्या करण्यात आली. सदर घटना पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत वुत्त असे की, वडांबा येथील रहिवासी प्रकाश बालगोविंद जैस्वाल यांचा नागपूर-जबलपूर महामार्गावर ढाबा आहे. प्रकाश नेहमीप्रमाणे रात्री ढाब्यावर आले. पहाटे चार ते पाच चे दरम्यान एका इसमाने त्याची हत्या करुन पळ काढला. यावेळी ढाब्यावर प्रकाश व्यतिरीक्त दोन नोकर व नजीकच्या वीटभट्यावर काम करण्याकरिता असलेले दोन तीन मजूर होते. प्रकाशच्या गालावर मोठी जखम आहे. धारदार शस्त्राने गालावर गंभीर वार केला. वार ईतका खोलवर गेला की त्यांच्या डोळ्याखालील मासाचा तुकडा जवळपास दहा फुट अंतरावर पडलेला दिसून आला. त्याचप्रमाणे त्यांचे रक्ताचे थेंबसुद्धा खूप लांबपर्यत उडाले व त्यांचे पलंगाखाली रक्ताचा लोट दिसून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.