शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

... तर दिल्लीसारखे महाराष्ट्राच्या उपराजधानीतही घालावे लागतील मास्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 10:09 IST

वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागपूरही दिल्लीच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उपराजधानीत वाहनांची संख्याही १५ लाख ७३ हजारावर

सुमेध वाघमारे।आॅनलाईन लोकमतनागपूर : वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागपूरही दिल्लीच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिल्लीकरासारखे मास्क नागपूरकरांनाही घालावे लागतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या स्थितीत उपराजधानीत वाहनांची संख्याही १५ लाख ७३ हजारावर गेली आहे. साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन असे हे प्रमाण आहे.

१३ लाख दुचाकी वाहनेशहरात एकूण वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य आहे. २०१३ मध्ये दुचाकींची संख्या १० लाख ३२ हजार ६०७ होती. २०१४ मध्ये ही संख्या १० लाख ६४ हजार ५७४ वर गेली तीन वर्षांत यात तीन लाखाने वाढ होऊन ही संख्या १३ लाखांवर गेली आहे. याच्या पाठोपाठ कारची संख्याही वाढत आहे. शहरात सध्याच्या घडीला १ लाख ३५ हजार कार्स रस्त्यांवर धावत आहे.गेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत सुमारे ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये शहरात वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख ७८ हजारावर गेली आता ती १५ लाख ७३ हजार २४३ वर पोहचली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ७५ हजार इतकी आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले आहेत.

दीड व्यक्तीमागे एक वाहनशहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहचली आहे. यातील सुमारे १० लाख लोकसंख्या १८ वर्षांखाली असेल असे गृहित धरले तरी २० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १५ लाख ७३ हजार २४३ वाहने आहेत. यावरून साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे आताच गांभिर्याने पाहिले नाही तर याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.‘हवा गुणवत्ता निर्देशका’च्या मापदंडानुसार नागपुरातील हवा गेल्या सहा महिन्यांपासून धोक्याच्या पातळीवर आहे. याला मुख्य कारण म्हणजे, शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम व वाहनाचे प्रदूषण. चांगली बाब ही आहे की, आपल्या शहराच्या भोवताल वीज निर्मिती प्रकल्प सोडल्यास उद्योग नाहीत. यामुळे दिल्लीसारखी स्थिती नाही. परंतु आपण त्या दिशेने वाटचाल करीत आहोत.-कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :pollutionप्रदूषण