शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

क्रूरकर्मा पालटकर पंजाबमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:38 AM

सख्ख्या बहिणीसह तिचे अवघे कुटुंब आणि पोटच्या मुलाची अमानुष हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला पंजाबमधील लुधियाना शहरातील एका झोपडपट्टीत अटक केली.

ठळक मुद्देपोलिसांनी बांधल्या मुसक्या : लुधियानात बसला होता दडून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सख्ख्या बहिणीसह तिचे अवघे कुटुंब आणि पोटच्या मुलाची अमानुष हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला पंजाबमधील लुधियाना शहरातील एका झोपडपट्टीत अटक केली.सर्वत्र थरकाप उडवून देणारे नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांचे हत्याकांड १० जूनच्या मध्यरात्रीनंतर घडले होते. सोमवारी ११ जूनला ते उघडकीस आल्यानंतर लोकमतने यासंबंधाने आजपर्यंत नवनवीन खुलासे केले आहेत.क्रूरकर्मा पालटकरने १० जूनला रात्री बहिणीच्या घरात आराम करण्याच्या नावाखाली आश्रय मिळवला. मध्यरात्रीनंतर बहीण अर्चना, तिची मुलगी वेदांती, पती कमलाकर आणिं सासू मीराबाई पवनकरसह स्वत:चा चार वर्षीय चिमुकला कृष्णा पालटकर हे सर्व गाढ झोपेत असताना या नराधमाने त्यांची निर्घृण हत्या केली होती. ११ जूनला सोमवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. हे हत्याकांड आरोपी पालटकर यानेच घडवून आणल्याचे उघड झाले. अंधश्रद्धेतून नराधम पालटकरने हे हत्याकांड घडविले आणि या हत्याकांडानंतर त्याने घेतलेल्या भाड्याच्या खोलीत रक्ताने माखलेले कपडे ठेवून विहिरीवर पहाटेच आंघोळ केली. अघोरी पूजाही मांडली. या पूजेत त्याने दही, दूध, लिंबू, बाहुली, हळद, कुुंकू, अक्षता अन् बहीण अर्चनाच्या केसाचा आणि कोंबडीच्या पिसांचा वापर केला. त्यानंतर मृतांची नावे कॅलेंडर(पोस्टर)वर लिहून ‘ते मेले’ असे लिहिले, नंतर हा नराधम फरार झाला. पोलीस त्याचा तेव्हापासून शोध घेत होते. नागपूरसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, काश्मीर राज्यातील वेगवेगळ्या भागात पोलीस त्याला शोधत असताना तो पंजाबमध्ये दडून बसला होता. हा क्रूरकर्मा लुधियानात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मंगळवारी मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी एक पथक विमानाने लुधियानाला रवाना केले. तिकडे परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांचे पथक वैष्णोदेवी येथून सरळ लुधियानात पोहचले तर, नंदनवन पोलिसांचे तिसरे एक पथक नागपुरातुन बुधवारी निघाले, ते तेथे आज पोहचले.ट्रकवाल्यांसोबत केली मैत्रीसूत्रांच्या माहितीनुसार, लुधियाना शहराबाहेर असलेल्या ट्रान्सपोर्ट प्लाझासारख्या परिसरात पालटकर दडून बसला होता. त्याने ट्रकवाल्यांसोबत मैत्री केली होती. बाजूच्या झोपडपट्टीत त्याने ठाण मांडले होते. ही माहिती मिळताच तीनही पोलीस पथकांनी तेथे अतिशय सावधगिरीने तपास करून क्रूरकर्मा पालटकरच्या गुरुवारी सायंकाळी मुसक्या बांधल्या. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. रात्री ही माहिती उपराजधानीत व्हायरल झाल्यानंतर नागपूरकरांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :MurderखूनArrestअटक