माझ्याशी लग्न कर, नाही तर.. इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण व विनयभंग

By योगेश पांडे | Updated: October 11, 2023 16:58 IST2023-10-11T16:56:34+5:302023-10-11T16:58:30+5:30

नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Marry me or i'll kill you; Underage girl student assaulted and molested by Instagram friend | माझ्याशी लग्न कर, नाही तर.. इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण व विनयभंग

माझ्याशी लग्न कर, नाही तर.. इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण व विनयभंग

नागपूर : इन्स्टाग्रामवर ओळखी झालेल्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केला. तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझा जीवच घेतो असे म्हणत त्याने मुलीचा विनयभंग केला. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

१७ वर्षीय विद्यार्थिनीची राजिक खान उर्फ रियाज खान (२२, नवीन कामठी) याच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. काही काळाने ते फोनवर बोलू लागले व त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. मात्र त्याची संगत चांगली नसल्याचे कळाल्यावर विद्यार्थिनीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यानंतर राजिक तिचा वारंवार पाठलाग करू लागला. त्याने तिला लग्नाचीदेखील मागणी घातली. मात्र त्याने तिला नकार दिला.

संतापलेल्या राजिकने ८ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजतादेखील असाच प्रकार केला. ९ ऑक्टोबर रोजी साडेआठ वाजता त्याने तिचा पाठलाग करत तिला रस्त्यात अडविले व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने तिला भर रस्त्यावर मारले. जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत त्याने तिचा विनयभंगदेखील केला. या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरली. तिने घरच्यांना या प्रकाराची माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात आरोपी राजिकविरोधात गुन्हा दाखलण्रण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Marry me or i'll kill you; Underage girl student assaulted and molested by Instagram friend