शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

राज्यात लवकरच मराठी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 8:06 PM

Nagpur News राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आठ ते दहा दिवसांत समिती स्थापन केली जाईल. समितीची अहवाल आल्यानंतर पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्दे कॉलेज सुरू होण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात मराठी भाषा विद्यापीठाची मागणी सातत्याने होत आहे. विधिमंडळातही हा विषय अनेकांनी उचलून धरला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आठ ते दहा दिवसांत समिती स्थापन केली जाईल. समितीची अहवाल आल्यानंतर पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (Marathi University soon in the state, Uday Samant)

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. संस्कृत भाषेचा विस्तार आणि विकास व्हावा म्हणून डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, फॉरेन्सिक सायन्स व मॉरिस कॉलेज या मोठ्या शिक्षण संस्थांना डीपीसीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ते म्हणाले. शहरातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात भरपूर दक्षता घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कॉलेज सुरू व्हावे, अशी आमची इच्छा आहे; पण विद्यार्थ्यांना बाधा होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. विद्यापीठ कायद्यात बदल करण्यासंदर्भात समितीचा अहवाल अजूनही आला नाही. तो अहवाल आल्यानंतर सभागृहात मांडावा लागणार असल्याचे सामंत म्हणाले.

सरकारपुढील संकटात पदभरती रखडली

महाविद्यालयात प्राध्यापकांची पदभरतीसंदर्भातील फाइल वित्त विभागाने थांबविली आहे. राज्य सरकारपुढे उभ्या ठाकलेल्या संकटांमुळे वित्त विभागानेच काही दिवस थांबायला सांगितले आहे. यासंदर्भात वित्त विभागाशी दोन वेळा बैठकी लावल्या होत्या; परंतु त्या रद्द झाल्या. आता वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक होणार असल्याचे सावंत म्हणाले.

शैक्षणिक शुल्काचा संभ्रम लवकरच दूर होईल

शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजची शिक्षण फी कमी केली आहे. शासकीय शिक्षण संस्थांमध्ये खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कपात केली आहे; पण खासगी शिक्षण संस्थांच्या शिक्षण शुल्क वसुलीत थेट सरकारला हस्तक्षेप करता येत नसल्याने आम्ही एफआरए कमिटी नेमली आहे. शिवाय निवृत्त आयएएस अधिकारी चिंतामण जोशी यांच्या अध्यक्षतेतही कमिटी नेमली आहे. या समितीचा अहवाल येत्या १५ दिवसांत येईल. त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांमध्ये फीसंदर्भातील संभ्रम दूर होईल, असे सामंत म्हणाले.

- छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे ३०१ कोटी वितरित

कोरोनामुळे सरकारला शिष्यवृत्ती नियमित देता आले नाही. त्यामुळे अनेक कॉलेजच्या प्राध्यापकांचे वेतनसुद्धा रखडले होते; पण माझ्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी ३०१ कोटी वितरित केले आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय, ओबीसी मंत्रालय व अल्पसंख्याक मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा आढावा घ्यावा लागेल, असे सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत