शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य महामंडळाच्या व्यापकतेचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:56 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आतापर्यंत महामंडळापासून दोन हात दूर राहिलेल्या साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. यानुसार २५ वर्षापासून नोंदणीकृत आणि कार्यरत असलेल्या साहित्य संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून महामंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. संस्थेने केलेली ही घटनादुरुस्ती मंगळवारी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नागपुरात जाहीर केली.

ठळक मुद्देबाहेरील संस्थांसाठी खुले केले दरवाजे : संमेलनाशिवाय वार्षिक अधिवेशनही होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठीसाहित्य महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आतापर्यंत महामंडळापासून दोन हात दूर राहिलेल्या साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. यानुसार २५ वर्षापासून नोंदणीकृत आणि कार्यरत असलेल्या साहित्य संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून महामंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. संस्थेने केलेली ही घटनादुरुस्ती मंगळवारी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नागपुरात जाहीर केली.महामंडळासोबत सध्या तीन घटक संस्था, पाच समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रासह देशात आणि परराष्ट्रात  २५ वर्षापासून नोंदणीकृत असलेल्या आणि कार्यरत असलेल्या संस्था इच्छा असल्यास महामंडळात समाविष्ट होऊ शकतात. संबंधित विभागाच्या घटक संस्थेची हरकत नसल्यास या संस्था महामंडळाच्या सहयोगी संस्था म्हणून कार्य करू शकतील. महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.याशिवाय दरवर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनासह सर्व संस्थांचे एक स्वतंत्र वार्षिक अधिवेशन भरविण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे समस्त मराठी भाषिकांसाठी मानाचे आणि एका साहित्यिक सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. मात्र साहित्य संमेलनात केवळ साहित्यविषयक गोष्टींचा उहापोह होत होता. त्यामुळे या साहित्य संमेलनात चर्चेला न येणारे महत्त्वाचे व गंभीर विषय तसेच संस्थात्मक विश्वाचे महत्त्वाचे प्रश्न, समस्या, अडचणी आदींवर चर्चा आणि उपाययोजनांवर भर दिला जावा यासाठी वार्षिक अधिवेशन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. झालेल्या घटनादुरुस्तीनुसार महामंडळाच्या वर्धापनदिनाला जोडूनच हे अधिवेशन होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे उपस्थित होते.निवडणुकीने नाही, निवडीने होणार यवतमाळचा अध्यक्षयवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा निवडणुकीने नाही तर निवडीनेच होणार असल्याचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी यावेळी जाहीर केले. विशेष म्हणजे महामंडळाने जून-२०१८ मध्ये घटनादुरुस्ती करून संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक रद्द केली होती. मात्र हा निर्णय पुढल्या साहित्य संमेलनापासून लागू होणार होता. यवतमाळ येथे होणाऱ्या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीनेच निवडला जाणार होता. मात्र घटनादुरुस्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक यावेळीपासूनच रद्द करीत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. त्यामुळे यवतमाळच्या अध्यक्षपदासाठी १ आॅक्टोबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रियाही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता अध्यक्षपदाची निवड ही सुचविलेल्या नावातून सन्मानाने होणार आहे. त्यानुसार महामंडळाच्या घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, समाविष्ट संस्थांकडून पाच, संलग्न संस्थांकडून प्रत्येकी एक नाव, संमेलन निमंत्रक संस्थेकडून एक तर विद्यमान संमेलन अध्यक्ष एक नाव, अशी २० नावे सुचविण्यात येणार आहेत. येत्या २८ आॅक्टोबर रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या महामंडळाच्या सभेपर्यंत ही नावे मागविण्यात आली आहेत. या सभेत या विषयावर चर्चा करून व नंतर पुढची प्रक्रिया पार पाडून संमेलन अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य