शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार

By admin | Updated: July 3, 2014 00:53 IST

मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यामुळे मराठी सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार आहे,

मुलाखत : सिनेपटकथाकार संजय पवार यांची लोकमतशी बातचीतसंतोष कुंडकर - चंद्रपूरमराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यामुळे मराठी सिनेमा पाहिलाच पाहिजे, असे त्याला वाटत नाही. त्यामुळे मराठी सिनेमांच्या अधोगतीला मराठी माणूसच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात सिनेपटकथा तथा नाट्य लेखक संजय पवार यांनी व्यक्त केले.राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्या नाटकांच्या महोत्सवाला बुधवारपासून येथे प्रारंभ झाला. या महोत्सवासाठी येथे आलेल्या संजय पवार यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली. मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळत नाही, ही ओरड सातत्याने होते. त्याला असलेल्या अनेक कारणांपैकी भाषाभिमान हेदेखील एक कारण आहे. दक्षिणेतील चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही, अन्य प्रांत वा देशातही चालतात. पण खुद्द महाराष्ट्रातच मराठी सिनेमा पहायला मराठी माणूस जात नाही. यावरून मराठी माणसांना मराठीचा किती अभिमान आहे, हे दिसून येते. दक्षिणेतील लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. म्हणून तेथे केवळ त्यांच्या भाषेतील चित्रपट चालतात. तेथे हिंदी सिनेमांनाही स्थान नाही. भोजपुरी सिनेमे दुबईतही चालतात. पण मराठी सिनेमा मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या बाहेर कधी पडत नाही. केवळ मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही, अशी ओरड करण्यापेक्षा आपला सिनेमा किती दर्जेदार आहे, याचाही निर्मात्यांनी विचार केला पाहिजे. कोणतंही प्रॉडक्ट तेव्हाच विकल्या जाईल, जेव्हा त्याला दर्जा असेल. आज डझनवार मराठी सिनेमे निघतात. केवळ शासनाचे अनुदान मिळते म्हणून मराठी सिनेमांची निर्मिती करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु त्यातील किती सिनेमे चित्रपटगृहापर्यंत पोहचतात, हा देखील संशोधनाचा विषय आहे, असेही ते म्हणाले. मी ठरवूनच चित्रपटसृष्टीत आलो, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून नाट्यलेखनाची आवड निर्माण झाली. सुरूवातीला नाटकातही कामे केली. त्यानंतर एकांकिका लिहिल्या. चाळ कमिटी, जाहिरात, बाप बी बाप, दुकान कुणी मांडू नये, नार्इंटीन फोर्टी सेव्हन ते एके फोर्टी सेव्हन यासह विविध नाटकांचे लेखन केले. यातील अनेक नाटके गाजली. पुढे सिनेक्षेत्रात पाऊल टाकले. जब्बार पटेलांच्या ‘मुक्ता’ या सिनेमासाठी संवाद लेखन केले. त्यानंतर डोंबिवली फास्ट (संवाद), सातच्या आत घरात (संवाद), सनई चौघडे (संवाद), मी सिंधूताई सपकाळ (पटकथा संवाद), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.. (पटकथा संवाद) या चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले. येत्या ११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘लई भारी’ या चित्रपटाचे संवाद लेखनही पवार यांनी केले आहे. हिंदीतही त्यांनी ज्युली, बिरूद या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.