शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाटक जाणार ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 23:50 IST

वेब सिरीज, चित्रपटांसाठी प्रचलित असलेल्या ‘ओव्हर दी टॉप सर्व्हिसेस (ओटीटी प्लॅटफॉर्म)’वर लवकरच मराठी नाटकेही प्रदर्शित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरज ही आविष्काराची जननी आहे आणि संकटात नित्य नवी गणिते जुळून येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगभूमीवरही अशी गणिते तयार व्हायला लागली आहेत आणि त्याच अनुषंगाने वेब सिरीज, चित्रपटांसाठी प्रचलित असलेल्या ‘ओव्हर दी टॉप सर्व्हिसेस (ओटीटी प्लॅटफॉर्म)’वर लवकरच मराठी नाटकेही प्रदर्शित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, मराठी नाट्यसृष्टीमध्ये नव्या व्यावसायिक धोरणांची दारे उघडली जाणार आहेत.टाळेबंदीमुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद करण्यात आले आहे. त्याचा सर्वाधिक फटका नाट्य निर्माते व रंगकर्मींना बसला आहे. त्याचा परिणाम आर्थिक गणितावर झाला आहे. रंगकर्मी किमान पुढील एक वर्ष तरी बेरोजगार असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आॅनलाईन नाटक सादर करण्याचा प्रस्ताव पुणे येथील काही नाट्यसंस्थांनी दिला होता. मात्र, तो प्रस्ताव नाटकानांच बाधक असल्याने बारगळला. आता त्याही पुढे जाऊन नागपुरातील काही नाट्य निर्माते, रंगकर्मी व नाट्यसंस्थांनी व्यावसायिक गणिते बसवून टाळेबंदीतही नाटकांना उभारी देण्याचा प्रयत्न चालवला आहे. नाटकांचे चित्रिकरण करून प्रथम फेसबुकवर आणि त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते नाटक प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयोगामुळे प्रथितयश रंगकर्मींसोबतच नव्या नाट्यकर्मींनाही चेतना मिळणार आहे. तूर्तास हा प्रयोग प्राथमिक स्तरावर लवकरच कार्यान्वित होणार आहे.तूर्तास प्रायोजक नंतर ओटीटी : देवेंद्र दोडकेगेले तीन महिने टाळेबंदीमुळे थिएटर्स बंद आहेत आणि पुढचे वर्षभर तरी उघडण्याची शक्यता नाही. थिएटर्स उघडलीही तरी प्रेक्षक संसर्गाच्या भीतीपोटी येतील का, असा सवाल आहे. अशा स्थितीत रंगकर्मी स्वस्थ बसून चालणार नाही. हाच विचार करत आम्ही एका नाटकाची तयारी चालवली आहे. एका स्टुडिओमध्ये या नव्या प्रयोगाच्या तालमी सुरू आहेत आणि तालमी पूर्ण होताच थेट सलग नाटकाचे चित्रिकरण केले जाईल. तूर्तास प्रायोजकाच्या शिफारशीवर याचा प्रयोग सोशल माध्यमावर प्रदर्शित होईल आणि त्यानंतर ज्याला प्रयोग बघायचा असेल त्याला विशिष्ट शुल्क भरावे लागेल, असा हा प्रयोग आहे. त्यानंतर ‘ओटीटी’वर नाटक प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो असल्याचे प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता देवेंद्र दोडके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक