माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवला, नागपूर मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रेंगाळल्या
By नरेश डोंगरे | Updated: December 22, 2023 22:59 IST2023-12-22T22:58:37+5:302023-12-22T22:59:14+5:30
झारखंडमधील घटना; हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवला, नागपूर मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रेंगाळल्या
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : झारखंडमध्ये माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. देशातील विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावू लागल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे.
झारखंडमधील गोइरलकेरा आणि पोसैता रेल्वे स्थानकाच्या दरम्यान गुरुवारी रात्री ही घटना घडली. त्यामुळे त्यावेळी धावणाऱ्या अनेक गाड्या आजुबाजुच्या स्थानकाजवळ थांबविण्यात आल्या. १२१२९ - पुणे हावड़ा एक्सप्रेस - राउरकेला येथे उभी करण्यात आली. १२८१० - हावड़ा सीएसएमटी एक्सप्रेस - चक्रधरपुरला आणि १२२२२ - हावड़ा पुणे एक्सप्रेस - चक्रधरपुरला थांबविण्यात आली. १२१५१ - एलटीटी शालीमार एक्सप्रेस - राउरकेला येथे उभी करण्यात आली तर, १२१३० - हावड़ा पुणे एक्सप्रेस - टाटा नगरमध्ये थांबविण्यात आली.----
विलंबाने धावणाऱ्या रेलवे
दरम्यान, या घटनेनंतर अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. वृत्त लिहिस्तोवर हाती आलेल्या माहितीनुसार, १८०३० शालिमार १२ तास, १२१०२ ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ९ तास, १२८१० हावडा सीएसएमटी मेल १० तास, १२१३० आझाद हिंद एक्सप्रेस ९ तास, १२८३४ हावडा अहमदाबाद ९ तास, १२२६२ हावडा-सीएसएमटी दुरंतो एक्सप्रेस ३.३० तास आणि १२२२२हावडा पुणे दुरंतो एक्सप्रेस २५ तास विलंबाने धावत होती.