मॅनेजरनेच कंपनीच्या साडेचौदा लाखांवर मारला डल्ला

By योगेश पांडे | Updated: December 9, 2023 17:27 IST2023-12-09T17:27:09+5:302023-12-09T17:27:25+5:30

एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या एका व्यवस्थापकानेच संस्थेच्या साडेचौदा लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला.

manager himself beat the company's fourteen and a half lakhs | मॅनेजरनेच कंपनीच्या साडेचौदा लाखांवर मारला डल्ला

मॅनेजरनेच कंपनीच्या साडेचौदा लाखांवर मारला डल्ला

नागपूर : एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या एका व्यवस्थापकानेच संस्थेच्या साडेचौदा लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मेघा इंजिनिअरींग ॲंड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे समृद्धी महामार्गाजवळ दाताळ कॅंप येथे कार्यालय आहे. तेथे कंडुला पिटची रेड्डी (४५, मारोती नगर, सोमाजीगुडा, हैदराबाद) हा असोसिएट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. कंपनीची रोकड हाताळायची जबाबदारी त्याच्याकडे होती.

त्यानेच २ ते ७ डिसेंबर या कालावधीत कंपनीतील १४.५६ लाखांची रक्कम स्वत:जवळच ठेवली व पोबारा केला. तो कामावरच न आल्याने कंपनीने त्याच्या घरी चौकशी केली. तसेच त्याच्या मोबाईलवरदेखील संपर्क केला. मात्र काहीच फायदा झाला नाही. अखेर वल्लुरी श्रीकांत वल्लुरी रमणय्या यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
 

Web Title: manager himself beat the company's fourteen and a half lakhs