मैत्रिणीसोबत झिल्पी तलावाजवळ फिरायला गेला अन् चोरट्यांनी लुटले

By योगेश पांडे | Updated: August 11, 2023 11:55 IST2023-08-11T11:54:54+5:302023-08-11T11:55:55+5:30

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

man went for a walk near the Zilpi lake with friend was robbed by thieves | मैत्रिणीसोबत झिल्पी तलावाजवळ फिरायला गेला अन् चोरट्यांनी लुटले

मैत्रिणीसोबत झिल्पी तलावाजवळ फिरायला गेला अन् चोरट्यांनी लुटले

नागपूर : मैत्रिणीसोबत झिल्पी तलावाजवळ फिरायला जाणे एका विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले. अज्ञात चोरट्यांनी दोघांनाही धाक दाखविला व तरुणाजवळचा मुद्देमाल चोरून नेला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील विद्यार्थी ह्रतिक (नाव बदललेले) हा गुरुवारी सकाळी १० वाजता मैत्रिणीसोबत कुणालाही काहीच न सांगता फिरायला गेले. दोघेही दुचाकी झिल्पी तलावाजवळ गेले. दोघेही तलावाच्या काठी एकांतात बसले असताना तीन अज्ञात आरोपी तेथे आले व येथे बसण्याची परवानगी नाही असे म्हणत दटावू लागले. तुम्ही नियम तोडले आहेत, असे म्हणून त्यांनी विद्यार्थ्याला पैसे मागितले. त्यांनी शिवीगाळ करत त्यांना मारण्याची धमकी दिली. 

आरोपींनी विद्यार्थ्याचे पाकिट, घड्याळ जबदरस्तीने काढून पळ काढला. विद्यार्थ्याने हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झिल्पी तलाव परिसरात अनेक विद्यार्थी महाविद्यालयांतील वर्ग बुडवून फिरायला जातात. अनेक प्रेमीयुगुले एकांत शोधत निर्जन ठिकाणी जाऊन बसतात. याचाच फायदा लुटारू घेतात व धमकी देऊन त्यांना लुटतात. बदनामीच्या भितीपोटी बहुतांश प्रकरणांत तक्रारच होत नाही.

Web Title: man went for a walk near the Zilpi lake with friend was robbed by thieves