अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम बापाला १५ वर्षे सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 13:59 IST2023-02-01T13:52:34+5:302023-02-01T13:59:38+5:30

सत्र न्यायालयाचा निर्णय

man gets 15 years rigorous imprisonment for raping minor daughter | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम बापाला १५ वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम बापाला १५ वर्षे सश्रम कारावास

नागपूर : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला मंगळवारी १५ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्या. एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला. ही घटना दाभा येथील आहे.

आराेपीला कलम ५०६ (धमकी देणे) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आरोपीने दंडाची रक्कम जमा केल्यास त्यापैकी १० हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून अदा करण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. आरोपीने २० जानेवारी २०१३ ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत हे कुकृत्य केले.

पीडित मुलीची आई नोकरी करीत होती. ती रात्री घरी येत होती. दरम्यान, पीडित मुलीला आरोपी वासनेची शिकार करीत होता. मुलीने शाळेतील शिक्षकांना ही माहिती दिल्यानंतर आरोपीचे कुकृत्य पुढे आले. परंतु बदनामीच्या भीतीमुळे पोलिस ठाण्यात लगेच तक्रार करण्यात आली नाही. मुलीवर उपचार करणारे डॉक्टर व चाईल्ड लाईन कार्यकर्त्यांनी धीर दिल्यानंतर आईने २० जानेवारी २०१८ रोजी गिट्टी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी १२ साक्षीदारांचे जबाब व इतर ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.

Web Title: man gets 15 years rigorous imprisonment for raping minor daughter