Nagpur | नमाज अदा करताना 'तो' अचानक खाली कोसळला अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 17:51 IST2022-10-01T15:54:36+5:302022-10-01T17:51:29+5:30
नागपूरच्या जाफर नगर येथील घटना

Nagpur | नमाज अदा करताना 'तो' अचानक खाली कोसळला अन्..
नागपूर : नमाज अदा करताना अचानक एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर व्हिडीओ पाहून अनेकांनी दु:ख व्यक्त केलयं.
नागपूरच्या जाफर नगर येथील मशिदीत गुरुवारी सदर व्यक्ती नमाज अदा करीत असताना अचानक तो खाली कोसळला. यावेळी इतर उपस्थितांनी धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने त्यांना यश आले नाही.
मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद जावेद (४५) असे असून तो अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याची प्रकृती ठीक नव्हती. आपल्या आजारपणाच्या उपचारासाठी तो नागपूरला आला होता. व आपल्या भावाकडे जाफरनगर येथे मुक्कामाला होता. दरम्यान, गुरुवारी तो मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेला होता. मशिदीत शेवटच्या रांगेत नमाज अदा करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तो खाली कोसळला व त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.