शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

 नागपुरात  दोन लाखावर रुग्णांची मलेरिया तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 8:58 PM

जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मलेरियाच्या निदानासाठी १ लाख ८७हजार ५११ रक्त नुमने घेण्यात आले. यात डेंग्यूचे ४९० रुग्ण आढळले असून त्यातील २०९ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाल्याची माहिती हत्तीरोग व हिवताप रोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. .

ठळक मुद्देडेंग्यूपासून बचावासाठी मलेरिया विभागाच्या सूचना : कुलर, प्लॉवरपॉटचे पाणी काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ज्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळून येतात, त्या घरातील व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेतले जातात. डेंग्यूचे निदान करण्याच्या दृष्टीने रक्त तपासणी केली जाते. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मलेरियाच्या निदानासाठी १ लाख ८७हजार ५११ रक्त नुमने घेण्यात आले. यात डेंग्यूचे ४९० रुग्ण आढळले असून त्यातील २०९ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाल्याची माहिती हत्तीरोग व हिवताप रोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. .जानेवारी महिन्यात २०,०४७, फेब्रुवारीत २४,०४८, मार्च महिन्यात १९,९१८, एप्रिल मध्ये ८,४३५, मे महिन्यात १९,९१८, जून १७,२३९, जुलै २५,५६९, ऑगस्ट महिन्यात २९,४६७ तर सप्टेंबर मध्ये ७,१७४ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. मलेरियाने कुणीही दगावला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.घरात बंद असलेल्या कुलरमध्ये पाणी असेल, फ्लॉवर पॉटमधील पाणी दररोज बदलवित नसाल, आजूबाजूला पडलेल्या टायरमध्ये पाणी साचले असेल तर अशा ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते. खबरदारी म्हणून नागरिकांनी अशा ठिकाणचे पाणी वेळोवेळी काढावे, असे आवाहन मलेरिया विभागाने केले आहे.डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यात तयार होतो. त्याची पैदास साठवून असलेल्या स्वच्छ पाण्यात गतीने होते. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी स्वच्छ पाणी एक दिवसापेक्षा अधिक वेळ जमा ठेवू नका. घरात लावलेल्या कुलरचा सध्या उपयोग नसेल तर त्यातील पाणी काढून ते कोरडे करा, घरातील फ्लॉवर पॉटमधील पाणी दररोज बदलवण्याचे आवाहन जयश्री थोटे यांनी केले आहे.मलेरिया, हत्तीरोग विभागातर्फे वेळोवेळी सर्वेक्षण करून डेंग्य डासांच्या पैदासीवर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जातो. विभागाचे ७८७ कर्मचारी शहरात कार्यरत आहे. डास उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. नागरिकांनी घरातील डास उत्पत्तीच्या संभाव्य जागा कोरड्या ठेवण्याचे आवाहन केले आहे.फायलेरियासाठी ६२३४४ रुग्णांची तपासणीफायलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलेरिया विभागातर्फे दरवर्षी गोळ्यांचे वाटप करण्यात येते. तरीही ज्या भागात फायलेरिया रुग्ण आढळले जाऊ शकतात, अशा परिसरातील सुमारे ६२,२४४ रुग्णांची स्लाईड तपासणी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली.

टॅग्स :dengueडेंग्यूNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका