पदवीधरचा गड कायम राखा

By Admin | Updated: June 16, 2014 01:09 IST2014-06-16T01:09:08+5:302014-06-16T01:09:08+5:30

आजपर्यंत मला प्राध्यापकांनी नेहमीच समर्थन दिले. तुमच्या विश्वासामुळेच मी आज या पदावर पोहोचू शकलो आहे. आता तुमच्यातीलच एक असलेले पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना,

Maintain the position of Graduate | पदवीधरचा गड कायम राखा

पदवीधरचा गड कायम राखा

गडकरी यांचे आवाहन : प्राध्यापकांशी संवाद
नागपूर : आजपर्यंत मला प्राध्यापकांनी नेहमीच समर्थन दिले. तुमच्या विश्वासामुळेच मी आज या पदावर पोहोचू शकलो आहे. आता तुमच्यातीलच एक असलेले पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांच्या पाठीमागे असेच भक्कमपणे उभे रहा व गड कायम राखा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. प्राध्यापक मित्र मंडळाद्वारे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित ‘संवाद’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
विद्यापीठाला गतिशील करण्यासाठी अनिल सोले यांच्यासारखे प्राध्यापक मोलाची भूमिका पार पाडू शकतात. शिक्षण देण्यासोबतच प्राध्यापकांनी आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला पाहिजे. शिक्षणाचे धडे देताना तंत्रज्ञानाची कास पकडून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता जागवली पाहिजे . शिकविण्याला जर ‘व्हिजन’ ची जोडी दिली तर त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल असेदेखील गडकरी म्हणाले. यावेळी शिक्षक आमदार नागो गाणार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर, प्रभूजी देशपांडे, प्राचार्य बोंद्रे, डॉ.चंद्रशेखर भुसारी, अशोक जीवतोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशात धावणार ‘ई-रिक्शा’
देशात लवकरच ‘ई-रिक्शा’ सुरू होणार असल्याची माहितीदेखील नितीन गडकरी यांनी दिली. १७ तारखेला यासंदर्भात विस्तृत निर्णय जाहीर करणार असून यामुळे देशातील २ कोटी लोकांना नवीन जीवन मिळेल.
शिवाय माणसाला माणसाने ओढण्याची अमानवीय पद्धत बंद होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Maintain the position of Graduate