शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

पिण्याचे पाणी जपून वापरा : मनपाचा ईशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:54 AM

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.

ठळक मुद्देमे अखेरपर्र्यंत अडचण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पात सध्या ९० टीएमसी जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ०.७ टीएमसी पाण्याची गरज आहे. याचा विचार करता ३१ मे पर्यंत शहरात पाण्याची अडचण जाणार नाही. कन्हान नदी पात्रातील प्रवाह कमी झाला आहे. परंतु नेटवर्क भागात तूर्त पाण्याची अडचण दिसत नाही. नॉननेटवर्क भागात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकरची मागणी वाढली आहे.गोरेवाडा व कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शहरात दररोज ६४० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. कन्हानमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने गेल्या दोन महिन्यात अनेकदा अघोषित पाणीकपात करण्यात आली. याचा विचार करता महापालिकेने विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.नळाच्या पाण्याचा उपयोग फक्त पिण्यासाठी करावा,असे आवाहन जलप्रदाय विभागाने केले आहे. वाहने, कपडे व भांडी धुण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेकजण वाहने व कपडे धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. याला आळा बसण्याची गरज आहे.गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठामानकानुसार प्रतिव्यक्ती दररोज जास्तीतजास्त १३५ लिटर पाण्याची गरज भासते. परंतु शहराला होणारा पाणीपुरवठा विचारात घेता प्रतिव्यक्ती दररोज २५० लिटर पाणीपुरवठा के ला जात आहे. मानकाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. असे असूनही शहरातील अनेक भागात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. होणारा पाणीपुरवठा विचारात घेता अशी परिस्थिती का निर्माण झाली असा प्रश्न निर्माण होतो.पर्यायी जलस्रोतासाठी प्रयत्नशहरातील ७८४ विहिरींचा सर्वे करून ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली. ५४८ विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासण्यासाठी पाठविण्यात आले. होते. परंतु यातील ९९ टक्के नमुने दूषित आढळून आले. हा नागरिकांसाठी धोक्याचा इशारा आहे.शहरात ५२५४ बोअरवेल आहेत. त्या दुरुस्त व रिचार्ज करण्याचे काम जलप्रदाय विभागाने हाती घेतले आहे. ३४७ बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी चार कंत्राटदार नियुक्त केले आहेत. तसेच बंद पडलेल्या बोअरवेल पुन्हा रिचार्ज करून वापरात आणण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी