शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील महामेट्रोचे 'लिटिल वूड' वन्य प्राण्यांसह सगळ्यांचे आकर्षणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:31 IST

हिंगणा मार्गावर महामेट्रोने निर्मिलेले ‘लिटिल वूड’ हे छोटेखानी जंगल आता झाडांनी आणि हिरवाईने बहरून आले आहे. या जंगलातील सौंदर्य आणि सुरक्षा शहरातील नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही आकर्षित करू लागले आहे.

ठळक मुद्देबिबट्यानेही सोडले पगमार्क : मोर-लांडोर सारख्या अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षांची लागवड आणि त्याचे संगोपन अतिशय महत्त्वाचे आहे. हिंगणा मार्गावर महामेट्रोने निर्मिलेले ‘लिटिल वूड’ हे छोटेखानी जंगल आता झाडांनी आणि हिरवाईने बहरून आले आहे. या जंगलातील सौंदर्य आणि सुरक्षा शहरातील नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही आकर्षित करू लागले आहे. पर्यावरणासंबंधी महामेट्रोची कार्यप्रणाली नेहमीच गांभीर्याने करण्याची असल्याने पर्यावरणपूरक हरित मेट्रोची निर्मिती करण्याचा निर्णय महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृ्रजेश दीक्षित यांनी घेतला होता.अल्पकाळातच हिंगणा मार्गावर ‘लिटिल वूड’ आणि अमरावती मार्गावर ‘एक्स्टेंशन लिटिल वूड’ स्थापन करून १४,५०० विविध प्रजातीय झाडांचे रोपण आणि संगोपन केले गेले. पर्यावरणपुरक वृक्षांसह फळ-फुलांचे वृक्ष तसेच औषधीयुक्त वृक्षांचे संगोपन महामेट्रोतर्फे करण्यात येत आहे. व्यस्त व रहदारीच्या परिसरात फळ-फुलांच्या सुगंधाने वातावरण बहरून आले आहे. देशी-विदेशी शेकडो पक्ष्यांव्यतिरिक्त १५० पेक्षा जास्त मोर-लांडोरांनी या क्षेत्रात आश्रय घेतला आहे. सुंदर पक्षाशिवाय वन्य प्राण्यांचे अनेक पुरावे या भागात सापडले आहे.बिबट्याने लिटिल वूड येथे आपले पगमार्क सोडले आहेत. श्रमिक शिवचंद्र कोडचा हे बिबट्याला प्रत्यक्ष पहिल्याचे साक्षीदार ठरले आहे. लिटिल वूडचे सौंदर्य आणि हिरवळीमुळे प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लोक भेट देत आहेत. ३६ औषधीय प्रजातीचे वृक्ष लावले जात आहेत. त्यात पिंपळ, वड, कडुनिंब, हिरडा, रिठा, महारूख अशा वृक्षांचा समावेश आहे. या भागात दुर्लभ प्रजातीचे पक्षी येत असतात. पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक सौंदर्याचे जतन या दोन्ही उद्देशाने करण्यात आलेले हे प्रयोजन नागपूर मेट्रोला अधिक विशेषत: प्राप्त करून देणारे ठरले आहे.लिटिल वूडमध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी लावण्यात आलेली झाडे आता १५ ते २० फूट उंच झाली आहेत. फळांनी लगडलेल्या वृक्षांवर विविध प्रजातीचे पक्षी दिवसभर चिवचिवाट करीत असतात. सायंकाळी फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी असते.

टॅग्स :Metroमेट्रोforestजंगल