महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन'! प्रवास भत्ता तिपटीने वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:19 IST2018-07-19T17:02:55+5:302018-07-19T17:19:19+5:30

आधिवेशानात हे सुधारणा विध्येयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. 

Maharashtra's MLAs Travel allowance increased | महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन'! प्रवास भत्ता तिपटीने वाढला 

महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन'! प्रवास भत्ता तिपटीने वाढला 

नागपूर -  महाराष्ट्रातील आमदारांना अच्छे दिन आले आहेत. आमदारांचा प्रवास भत्ता प्रति किलोमीटर 6 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. नागपूरात सुरु असलेल्या आधिवेशानात हे सुधारणा विधायक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ , जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरावे लागते म्हणून आमदारांच्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असल्याचे गिरीष बापट यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात 2016 मध्ये पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात एका विधेयकाद्वारे आमदारांचे व माजी आमदारांचे वेतन, भत्ते तसेच निवृत्तिवेतन एकमताने वाढविण्यात आले होते.

महाराष्ट्रातील आमदारांचा पगार किती?

  1. महागाई भत्ता  91,120 रुपये 
  2. दूरध्वनी खर्च 80, 00 रुपये
  3. संगणक चालकाचा पगार 10, 000 रुपये
  4. टपालासाठी 10, 000 रुपये
  5. मूळ पगार 67, 000 रुपये

Web Title: Maharashtra's MLAs Travel allowance increased