राष्ट्रीय वूडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ दोन्ही गटांत चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:08 IST2025-03-26T17:06:13+5:302025-03-26T17:08:18+5:30
Nagpur : १३ वी सबज्युनिअर राष्ट्रीय वूडबॉल स्पर्धा

Maharashtra team wins in both categories in National Woodball Championship
नागपूर : महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर आयोजित १३ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर वूडबॉल स्पर्धेत वर्चस्व गाजवित जेतेपदाचा मान मिळविला. वूडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र वूडबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ राज्यातील ५५० खेळाडूंचा सहभाग होता.
स्ट्रोक सांघिक प्रकारात महाराष्ट्र संघ दोन्ही गटांत विजेता ठरला. फेअर वे प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्र तसेच मुलींच्या गटात गुजरातने बाजी मारली. स्पर्धेचे पुरस्कार वितरण काटोलच्या माधुरीताई देशमुख नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. रेखा राणीसिंग, उपप्राचार्य डॉ. सुषमा मानवटकर, प्राची बागडे, सुप्रिया मसराम, जयश्री आगलावे आणि काजल रॉबिनसिंग कांडा आदींच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या संघांना आणि खेळाडूंना आकर्षक करंडक तसेच सुवर्ण, रौप्य तसेच कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वूडबॉल फेडरेशनचे महासचिव अजय सोनटक्के, कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर, उपाध्यक्ष किशोर बागडे, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष कुमार मसराम आदींची उपस्थिती होती. संजीव कुमार यांनी संचालन केले.
१३ वी सब ज्युनिअर स्पर्धा निकाल : मुले सांघिक स्ट्रोक प्रकार : महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश. मुली सांघिक : विजेता महाराष्ट्र, गोवा गुजरात. मुले एकेरी : के. असलम बाशा आंध्र, दुहेरी : के. असलम बाशा-सी. युवराज आंध्र. मुली एकेरी : नंदिनी साबळे महाराष्ट्र, दुहेरी : सोनाक्षी मखवानी- रिया यादव गुजरात. फेअर वे प्रकार : मुले सांघिक : महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, तामिळनाडू. मुली सांघिक : विजेते गुजरात, उपविजेते गोवा.
मुले एकेरी : शिवांश मिश्रा महाराष्ट्र, दुहेरी : सुप्रिय दत्ता- एसजे कार्तिक महाराष्ट्र. मुली एकेरी : रूपल कालकर महाराष्ट्र. दुहेरी : डी. नंदिनी- जी. सारिका तेलंगणा.