अर्चित चांडक अकोल्याचे तर, तांबे बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक
By योगेश पांडे | Updated: May 22, 2025 17:34 IST2025-05-22T17:32:47+5:302025-05-22T17:34:35+5:30
Maharashtra Police Transfer: गृह विभागाने गुरुवारी २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली.

अर्चित चांडक अकोल्याचे तर, तांबे बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक
योगेश पांडे, नागपूर: वाहतूक पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांची अकोला येथे अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे अन्वेषण विभागातील अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. गृह विभागाने गुरुवारी २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली.
चांडक हे मागील काही काळापासून वाहतूक शाखेची जबाबदारी सांभाळत होते. नागपुरात मार्च महिन्यात झालेल्या दंगलींमध्ये ते जखमीदेखील झाले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील बऱ्याच ठिकाणची वाहतूक कोंडी दूर झाली होती. विशेषत: रहाटे कॉलनीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न त्यांनी सोडविला होता. त्यांची अकोला येथे बदली झाली आहे. तर अकोला येथील पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची रा.रा. पोलिस बल गट क्र.४ चे समादेशक म्हणून बदली झाली आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेतील विशेष कृती दलातील उपायुक्त मंगेश शिंदे यांच्याकडे नागपुरात लोहमार्ग अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.