शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Maharashtra Government : मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:16 AM

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देदेशमुख, राऊत, जयस्वाल, केदारांची नावे चर्चेत : नव्या चेहऱ्यालाही संधीची शक्यता

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भविष्यात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता शहर व ग्रामीण असा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.नागपूर शहरात काँग्रेसचे माजी मंत्रीनितीन राऊत, आ. विकास ठाकरे, ग्रामीणमध्ये आ. सुनील केदार व आ. राजू पारवे तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्रीअनिल देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असल्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी पक्की मानली जात आहे.नुकतेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्याचा पीक पाहणी दौरा केला. यादौऱ्यात देशमुख यांनी पवार यांचे सारथ्य केले होते. देशमुख यांच्या घरीही भेट दिली होती. संत्रा उत्पादकांशी संवाद साधला होता. त्यावेळी देशमुख ज्या पद्धतीने पवारांसोबत फिरत होते, त्यावरून त्यांचा नंबर पक्का मानला जात आहे. १९९५ ते २०१४ या काळात देशमुख मंत्री होते. गेल्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपद भूषविले होते.काँग्रेसच्या कोट्यात मंत्रिपदासाठी काहिशी रस्सीखेच होऊ शकते. आ. नितीन राऊत हे ज्येष्ठ सदस्य आहेत. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. विदर्भातील मागासवर्गीय नेता म्हणून त्यांच्या नावाला झुकते माप दिले जाऊ शकते. राऊत हे आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी व जलसंवर्धन मंत्री होेते. ज्येष्ठतेमुळे आ. सुनील केदार यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व उमरेडचे आमदार राजू पारवे हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहेत. मात्र, काँग्रेस नेत्यांशी असलेले निष्ठेचे संबंध पाहता ठाकरे यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.आ. आशिष जयस्वाल हे मुळातच शिवसैनिक आहेत. युतीमध्ये रामटेकची जागा भाजपला सुटल्यामुळे ते अपक्ष म्हणून लढले व विजयी झाले. विजयी होताच त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला समर्थन जाहीर केले. युती सरकारमध्ये त्यांना खनिकर्म महामंडळ देण्यात आले होते. नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा घट्ट रोवण्यासाठी जयस्वाल यांना संधी मिळणे निश्चित मानले जात आहे. तीन प्रमुख पक्ष व मित्रपक्षांचे हे सरकार असल्यामुळे वाटाघाटीत कमी मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच होत असून यात कोण बाजी मारतो हे गुरुवारी शपथविधीनंतर स्पष्ट होईल.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्रीAnil Deshmukhअनिल देशमुखNitin Rautनितीन राऊतAshish Jaiswalआशीष जयस्वाल