शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Maharashtra Election 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:05 IST

आपला गड शाबूत राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

- कमलेश वानखेडेनागपूर शहर व जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागा सद्यस्थितीत भाजपच्या ताब्यात आहेत. आपला गड शाबूत राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादीनेही बहुतांश जागी नवे चेहरे देऊन तगडे आव्हान उभे केले आहे. बहुतांश बंडखोरांनी माघार घेतली असून नागपूर दक्षिण व रामटेक मतदारसंघात मात्र भाजप-सेना व काँग्रेसच्या बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवाराचा ताप वाढविला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसकडून माजी आ. आशिष देशमुख यांनी आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री राज्यभर प्रचारात व्यस्त असल्याने भाजपच्या स्थानिक टीमने धुरा सांभाळली आहे. येथे ‘आॅल इज वेल’ असल्याचा त्यांचा दावा आहे.माजी मंत्री अनिल देशमुख नितीन राऊत व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. देशमुखांना काटोलमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर तर राऊत यांना भाजपचे आ. मिलिंद माने टक्कर देत आहेत. भाजपचे आ. सुधाकर देशमुख यांच्यासमोर काँग्रेसचे विकास ठाकरे ठाकले आहेत. या तिन्ही जागांवर काट्याची टक्कर पहायला मिळेल.दक्षिण नागपुरात भाजपचे आ. मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे असा तिरंगी सामना आहे. येथे मानमोडे यांनी काँग्रेसची तर बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक सतीश होले व शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी भाजपची डोकेदुखी वाढविली आहे. पूर्व नागपुरात भाजपचे आ. कृष्णा खोपडे व काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यात तर मध्य नागपुरात भाजपचे आ. विकास कुंभारे यांच्याविरोधात युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यात थेट लढत आहे. येथे हलबा-मुस्लीम मतदारांवर विजयाचे गणित अवलंबून आहे.सावनेरमध्ये आ. सुनील केदार यांच्यासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचे कडवे आव्हान आहे. उमरेडमध्ये भाजपचे आ. सुधीर पारवे यांच्याविरोधात काँग्रेसने राजू पारवे यांच्या रूपात नवा चेहरा देऊन रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. हिंगण्यात भाजपचे आ. समीर मेघे व काँग्रेसकडून रिंगणात असलेले माजी आ. विजय घोडमारे यांच्यात थेट लढत आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) भाजपतर्फे शहर व जिल्ह्यातील विकास कामांचा पाढा वाचला जात आहे.२) देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मु्ख्यमंत्री करण्यासाठी भाजप मत मागत आहे.३) काँग्रेसने बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या समस्यांचा प्रमुख मुद्दा घेतला आहे.४) वाढती महागाई व सरकारचे अपयश काँग्रेस जनतेसमोर मांडत आहे.रंगतदार लढतीपश्चिम नागपुरात भाजपचे आ. सुधाकर देशमुख व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यात जुनीच लढत रंगणार आहे.दक्षिण नागपुरात भाजपचे माजी आ. मोहन मते, काँग्रेसचे गिरीश पांडव व अपक्ष प्रमोद मानमोडे अशी तिरंगी लढत आहे. येथे काँग्रेस व भाजप समोर बंडखोरीचे मोठे आव्हान आहे.कामठी मतदारसंघात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेवर भाजपचे टेकचंद सावरकर रिंगणात आहेत. काँग्रेसकडून जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर रिंगणात आहे. या लढाईची जिल्ह्यात चर्चा आहे.रामटेकमध्ये भाजपचे आ. मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेसचे उदयसिंग यादव व बंडखोरी करीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर