शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:24 PM

मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्दे२३ लाख ८५ हजार ७९९ मतदानाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या संथ मतदानामुळे उमेदवारांची आणि राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. मतदारांचा हा कल नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर राजकीय गोटात चर्चा सुरू दिसत आहे.नागपूर जिल्ह्यात एकूण ४१ लाख ७१ हजार ४२० मतदार आहेत. त्यापैकी फक्त २३ लाख ८५ हजार ७९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी झालेल्या मतदानामध्ये मतदारांचा अपेक्षित उत्साह दिसला नाही. मतदानाची वेळ संपल्यावर सायंकाळी ६ वाजता रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाची संधी दिली जाते. अनेक केंद्रांवर मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत रांगेत मतदार असल्याने मतदानाचा सरासरी आकडा आधी ५८.३० टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मंगळवारी आलेल्या अंतिम आकडेवारीमध्ये घट झाली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातील १४६ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ग्रामीण क्षेत्रातील सहा जागांसाठी ६० टक्क्यांवर मतदान झाले आहे. मात्र शहरातील मतदानाचा आकडा घटला आहे.९९ पैकी फक्त ६ तृतीयपंथीयांचे मतदानजिल्ह्यात ९९ तृतीयपंथी मतदारांची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र अनेकांनी मतदान करण्याचे टाळले. फक्त सहा जणांनीच मतदान केल्याचे दिसून आले. पुरुषांच्या मतदानाचा टक्का महिलांच्या मतदानापेक्षा अधिक आहे. अर्थात महिलांच्या मतदानात घट झाली आहे.शहरातील दोन जागांवर ५० टक्क्यांहून कमी मतदाननागपूर लोकसभा मतदार संघात येणारे सहा विधानसभा मतदार संघ रामटेक लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत मागे पडले आहे. जिल्ह्याचे एकूण मतदान ५७.१९ टक्क्यांवर पोहचविण्यात ग्रामीण क्षेत्रातील मतदारसंघांचे योगदान अधिक आहे. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी दोन मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५० पर्यंतही पोहचू शकली नाही. यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मतदारसंघ नागपूर दक्षिण-पश्चिम (४९.८७ टक्के) आणि नागपूर पश्चिम (४९.२२ टक्के) या मतदारसंघाचा समावेश आहे. शहरात सर्वाधिक मतदान नागपूर पूर्व मतदारसंघात (५३.३० टक्के) झाले आहे.मतदार संघ     मतदानमध्य नागपूर ५०.६४पूर्व नागपूर ५३.३०उत्तर नागपूर ५०.७६दक्षिण पश्चिम ४९.८७पश्चिम नागपूर ४९.२२दक्षिण नागपूर ५०.३०उमरेड ६९.३७काटोल ६९.४४हिंगणा ६०.०५रामटेक ६६.०९कामठी ५८.८५सावनेर ६७.८२एकूण ५७.१९

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानnagpurनागपूर