Maharashtra Assembly Election 2019 :छोटा ताजबागपासून मोहन मते यांच्या प्रचाराला प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:36 AM2019-10-10T00:36:08+5:302019-10-10T00:36:53+5:30

भाजपचे दक्षिण नागपुरातील उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार पदयात्रेला बुधवारपासून शुभारंभ झाला. छोटा ताजबाग येथे दर्शन घेऊन मोहन मते यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Maharashtra Assembly Election 2019: Mohan Mate's campaign starts from Chota Tajbagh | Maharashtra Assembly Election 2019 :छोटा ताजबागपासून मोहन मते यांच्या प्रचाराला प्रारंभ 

Maharashtra Assembly Election 2019 :छोटा ताजबागपासून मोहन मते यांच्या प्रचाराला प्रारंभ 

Next
ठळक मुद्देदक्षिण नागपुरात पदयात्रा : नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे दक्षिण नागपुरातील उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार पदयात्रेला बुधवारपासून शुभारंभ झाला. छोटा ताजबाग येथे दर्शन घेऊन मोहन मते यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले, माजी उपमहापौर तथा शिवसेना नेते शेखर सावरबांधे, शिवसेनेचे दक्षिण नागपूर प्रमुख राजू तुमसरे, नगरसेविका दिव्या धुरडे, मंगला खेकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रचाराला प्रारंभ केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. या प्रचार पदयात्रेमध्ये नेतेमंडळींसह नगरसेविका स्वाती आखतकर, स्नेहल बिहारे, भाजपचे मंडळ अध्यक्ष संजय ठाकरे, माजी नगरसेवक बळवंत जिचकार, रमेश सिंगारे, देवेंद्र दस्तुरे, प्रशांत कामडी, किशोर पेठे, विलास करांगळे, सुनील मानेकर, नाना आदेवार, अशिष वांदिले, विकास बाबरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छोटा ताजबाग, आयुर्वेदिक ले-आऊट, भांडे प्लॉट, बापुनगर, मिरे ले-आऊट, कबीरनगर, गुरुदेवनगर, कीर्तीनगर, जगनाडे चौक, मंगलमूर्ती चौक, दत्त मंदिर अशा विविध ठिकाणी ही पदयात्रा जात असताना कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. दुपारी ओमनगर सुदामपुरी, नेहरूनगर या भागातील नागरिकांनी देखील मोहन मते यांच्या प्रचार यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना मोहन मते यांनी दक्षिण नागपूरच्या विकासाकरिता भारतीय जनता पार्टीने दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या कामाला प्राधन्यक्रम देऊन जनतेची सेवा करण्याची हमी त्यांनी दिली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Mohan Mate's campaign starts from Chota Tajbagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.