Maharashtra Assembly Election 2019 :स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : प्रकाश गजभिये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 22:16 IST2019-10-23T22:15:51+5:302019-10-23T22:16:15+5:30
ईव्हीएम मशीन टॅम्परिंग होऊ शकत असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.

Maharashtra Assembly Election 2019 :स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा : प्रकाश गजभिये
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईव्हीएम मशीनमध्ये टॅम्परिंग होऊ शकते, असे अनेक दाखले पुढे आले असून, ईव्हीएम मशीनची निर्मिती केलेल्या देशांनीसुद्धा त्यांचा वापर बंद केला आहे. ईव्हीएम मशीन टॅम्परिंग होऊ शकत असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. राज्यात ईव्हीएम मशीनच्या तक्रारी ५० पेक्षा जास्त आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबत शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी, अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.