Maharashtra Assembly Election 2019 : बसपा यंदा महाराष्ट्रात खाते उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:46 IST2019-10-11T22:43:57+5:302019-10-11T22:46:45+5:30
विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

Maharashtra Assembly Election 2019 : बसपा यंदा महाराष्ट्रात खाते उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
राज्यात बसपाने २६४ जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला आमची ताकद माहीत आहे. आमच्या खूप जागा निवडून येतील, असे आम्ही म्हणणार नाही. परंतु विदर्भात आमच्या पक्षाचा चांगला जनाधार आहे. चार ते पाच जागांवर आम्ही मजबूत आहोत. उत्तर नागपूर हा मतदार संघ आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्या निवडणुकीमध्ये या मतदार संघातून बसपाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. ५५ हजारावर मते आम्ही घेतली होती. यंदा येथून खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनाच मैदानात उतरविले आहे. त्यामुळे ही जागा आम्ही खेचून आणू असा दावाही डॉ. सिद्धार्थ यांनी केला.