शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गडकरींच्या विकासाची जादू चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:55 IST

एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.

ठळक मुद्देतुमाने यांचे सव्वा लाखाहून अधिक मताधिक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यापासूनच गडकरी आघाडीवर होते. रात्री एक नंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. अठराव्या फेरीनंतर गडकरींना ६ लाख ५२ हजार २४१ (५५.६७ %) इतकी तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांना ४ लाख ३९ हजार ११४ (३७.४८ %) इतकी मतं मिळाली. या फेरीनंतर गडकरी यांचे मताधिक्य २ लाख १३ हजार १२७ इतके होते. अखेरच्या फेरीनंतर गडकरी सुमारे २ लाख १५ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. 

दुसरीकडे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना २५ व्या फेरीअखेर ५ लाख ६५ हजार ३६० मतं मिळाली. तर कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांच्या वाट्याला ४ लाख ४५ हजार १५२ मतं आली. या फेरीअखेर तुमाने हे १ लाख २० हजार २०८ मतांनी समोर होते. अखेरच्या फेरीअखेर तुमाने यांचे मताधिक्य सव्वा लाखाहून अधिक झाले होते.दुपारी निकालाचा कल आल्यानंतरच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केली होती. शहरातील विविध भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोबतच कळमना मार्केट यार्ड परिसराजवळदेखील रात्री उशीरा जल्लोष करण्यात आला.नागपुरातील विजयामुळे गडकरी यांचे केंद्रातील वजन आणखी वाढले आहे. गडकरी यांच्या विजयाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या विकासकारणाला जात असून नागपुरात झालेल्या विकासकामांची पावती मतदारांनी मतांच्या रुपात त्यांना दिलेली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात पटोले यांनी गडकरींवर व्यक्तिगत टीकादेखील केली होती. मात्र गडकरी यांनी टीका करण्यापेक्षा आपली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यावरच भर दिला. मागील पाच वर्षांत केंद्रात काम करत असतानादेखील मतदारांशी कायम राखलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारसंघातील वेगवान विकासकामे ही गडकरी यांच्या विजयाची प्रमुख कारणे ठरली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक