सना खान हत्या प्रकरणात अखेर मध्य प्रदेशचे आमदार चौकशीसाठी नागपुरात

By योगेश पांडे | Updated: August 24, 2023 13:38 IST2023-08-24T13:38:13+5:302023-08-24T13:38:39+5:30

सना खानची आई झोन 2 पोलीस उपायुक्त कार्यालयात दाखल, संतप्त पवित्रा

Madhya Pradesh MLA in Nagpur for inquiry in BJP Sana Khan murder case | सना खान हत्या प्रकरणात अखेर मध्य प्रदेशचे आमदार चौकशीसाठी नागपुरात

सना खान हत्या प्रकरणात अखेर मध्य प्रदेशचे आमदार चौकशीसाठी नागपुरात

नागपूर : भाजपची पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणात काँग्रेसचे मध्य प्रदेशातील आमदार संजय शर्मा यांच्या चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. मानकापूर पोलीस ठाण्यातून त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते मात्र बुधवारी न येता ते गुरुवारी नागपुरात दाखल झाले आहे. झोन २ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे.

चौकशी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमित शाहू व त्याच्या साथीदारांना आमदारासमोर उपस्थित केले. सर्वांना एकत्रित बसवून पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत. चौकशी सुरू असताना मृतक सना खान यांची आई मेहरूनिसा खान यादेखील कार्यालयात उपस्थित झाल्या. त्यांचा सूर संतापाचा होता व इतके दिवस पोलिसांनी नेमकं काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांचा संताप पाहता पोलीस कर्मचारी त्यांना आज घेऊन गेले असून चौकशीच्या ठिकाणी त्यादेखील उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित साहू सुमारे पंधरा वर्ष अगोदर शर्मा यांच्यासाठी काम करत होता.

संजय शर्माचा दावा माझा कुठलाही संबंध नाही

ज्यावेळी संजय शर्मा पोलीस चौकशीसाठी उपस्थित झाले तेव्हा त्यांनी या प्रकरणाची मला काहीही माहिती नसून याबाबत माझा काहीही संबंध नाही असा दावा केला. पोलिसांनी मला चौकशीसाठी का बोलावले आहे याची मला कल्पना नाही असेदेखील त्यांनी सांगितले.

Read in English

Web Title: Madhya Pradesh MLA in Nagpur for inquiry in BJP Sana Khan murder case