शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

केले आताच अवघे शतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:36 AM

१०२ वर्षे वयाच्या मनोरमा नरहर सहस्रबुद्धे आणि १०१ वर्षांच्या शांता रामचंद्र लोटे. जागतिक महिला दिनानिमित्त अलीकडेच त्यांची भेट घेतली.

ठळक मुद्देया दोघीही दोन-चार वर्षापूर्वीपर्यंत सूर्यनमस्कार घालीत होत्या

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: चेहऱ्यावर गोडसर प्रेमळ हास्य... आवाजात एक लयबद्ध थरथरते मार्दव... हालचालीत एक संयत चपळता आणि आयुष्याप्रती काठोकाठ भरलेला सहजभाव. झाले गेले विसरून जायचे आणि आजचा स्वीकार पूर्णत्वाने करायचा या जीवनमंत्राने दिलेली साथ... बालपणाच्या आठवणींचे अखंड झरणारे स्मरण चांदणे आणि जीव लावणाऱ्या आप्तजनांचा सभोवती असलेला आश्वस्त वावर. हे सगळे वर्णन आहे वयाची शंभरी पार केलेल्या दोन उत्साहमूर्तींचे. १०२ वर्षे वयाच्या मनोरमा नरहर सहस्रबुद्धे आणि १०१ वर्षांच्या शांता रामचंद्र लोटे. जागतिक महिला दिनानिमित्त अलीकडेच त्यांची भेट घेतली.वयाच्या शंभरी गाठलेल्या व्यक्तीमधील ऊर्जा मावळलेली असते, या समजाला पार धुळीला मिळवील असा दिनक्रम या दोघींचा आहे. पहाटेच उठणे, प्राणायाम, बसल्या बसल्या पायांचे व्यायाम, (या दोघीही दोन-चार वर्षापूर्वीपर्यंत सूर्यनमस्कार घालीत होत्या), दूध किंवा सूप असा हलका आहार. स्नान स्वत: करतात. मनोरमाआजी तर स्वत:चे लुगडे स्वत: धुतात. नंतर देवपूजा. शांता आजी दुपारी जप करतात, भजन म्हणतात किंवा आराम करतात. मनोरमाआजी वाचन करतात. वीणकाम करतात. त्यांची दृष्टी अजूनही चांगली आहे. दोघींनाही गाढ व लगेचच झोप लागते. त्यांना कुठलाही निद्रानाशाचा त्रास नाही. मधुमेह, रक्तदाब असे काहीही नाही.दोघींचाही प्रवास तसा समांतर झालेला. मनोरमाआजींचा जन्म २४ एप्रिल १९१५ चा तर शांताआजींचा १ जुलै १९१७ चा. त्यांचे लहान वयात लग्न झाले. संयुक्त कुटुंबाची जबाबदारी दोघींनीही पेलली. आयुष्यातले अनेक चढउतार, दु:खाचे प्रसंग, कष्टाचे दिवस, जोडीदाराचे जाणे, पोटच्या मुलांचे अकाली मृत्यू, हलाखीची परिस्थिती असे सगळेच या दोघींनी अनुभवले आहे. मात्र त्यांच्या चेहऱ्यांवर ताज्या फुलाचे हास्य सदैव विलसत असलेले आपण केव्हाही पाहू शकतो. महिला दिनाचा समस्त स्त्रीवर्गाला दोघी देत असलेला हाच तो संदेश असावा.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस