लग्नाचे आमिष दाखविले, शरीरसंबंध ठेऊन वाऱ्यावर सोडले
By दयानंद पाईकराव | Updated: July 28, 2023 18:27 IST2023-07-28T18:27:02+5:302023-07-28T18:27:43+5:30
युवतीने लग्नाचा आग्रह केला असता आरोपीने तिला शिविगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली

लग्नाचे आमिष दाखविले, शरीरसंबंध ठेऊन वाऱ्यावर सोडले
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर युवतीला वाऱ्यावर सोडणाऱ्या आरोपीविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रथम धिराज नकवे (वय २१, रा. वरोरा जि. चंद्रपूर ह. मु. गोकुळपेठ, अंबाझरी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिडीत २६ वर्षाची युवती ही गोंदियाला राहते. १० ऑगस्ट २०२२ मध्ये ती खासगी नोकरी करण्यासाठी नागपुरात आली होती. आरोपी प्रथम सुद्धा नागपुरात खासगी नोकरी करतो. दरम्यान दोघांची ओळख झाली. आरोपी प्रथमने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. वर्षभर तिच्याशी तो शरीरसंबंध करीत होता. दरम्यान एकदा त्याने आपल्या अंबाझरी येथील खोलीवर नेऊन युवतीला हाताबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाचा आग्रह केला असता आरोपीने तिला शिविगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने अंबाझरी पोलिसात तक्रार दिली. अंबाझरी पोलिसांनी आरोपी प्रथम विरुद्ध कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.