LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 11, 2026 23:41 IST2026-04-11T23:39:02+5:302026-04-11T23:41:35+5:30

Nagpur LPG Crisis: नागपुरात तिन्ही सरकारी तेल कंपन्या आणि खासगी कंपन्यांच्या जवळपास ६० गॅस एजन्सींमध्ये सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.

LPG Crisis: Government claim false, there is a 'drought' of cylinders in Nagpur! The plight of consumers waiting for 40 days | LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल

LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल

-मोरेश्वर मानापुरे, नागपूर
केंद्र आणि राज्य सरकारकडून सिलेंडरचा ७० टक्के पुरवठा सुरळीत झाल्याचे छातीठोकपणे सांगितले जात असले, तरी नागपुरातील वास्तव मात्र पूर्णपणे वेगळे आहे. शहरातील तिन्ही सरकारी तेल कंपन्या आणि खासगी कंपन्यांच्या जवळपास ६० गॅस एजन्सींमध्ये सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, ग्राहकांना एका सिलेंडरसाठी तब्बल ४० दिवस वाट पाहावी लागत असून, याच परिस्थितीचा फायदा घेत काळ्या बाजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.

२५ दिवसांची अट अन् १५ दिवसांची वेटिंग

नागपूरकर ग्राहकांसाठी घरगुती सिलेंडर मिळवणे आता युद्ध जिंकण्यासारखे झाले आहे. सध्याच्या नियमानुसार, एकदा बुकिंग केल्यानंतर पुढच्या २५ दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग करता येत नाही. त्यात भर म्हणजे, बुकिंग केल्यानंतर प्रत्यक्षात सिलेंडर घरी येण्यासाठी पुन्हा १५ दिवस लागतात. म्हणजेच, एका सिलेंडरसाठी ग्राहकांना ४० दिवसांचा कालावधी लागत आहे. जर पुरवठा सुरळीत आहे, तर ही ‘२५ दिवसांची जाचक अट’ सरकार का काढत नाही? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

व्यावसायिकांचे कंबरडे मोडले; ५ हजारात सिलेंडर!

व्यावसायिक सिलेंडर ग्राहकांची स्थिती तर अधिकच गंभीर आहे. लग्नकार्य आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी कॅटरर्सना दररोज ३ ते ४ सिलेंडरची आवश्यकता असते. मात्र, गॅस एजन्सीकडून एवढा पुरवठा होत नसल्याने त्यांना काळ्या बाजाराकडे वळावे लागत आहे. 

१९ किलोचे व्यावसायिक सिलेंडर काळ्या बाजारात चक्क ५ हजार रुपयांना विकले जात आहे. अनेक घरगुती ग्राहकांना गरजेपोटी अडीच ते तीन हजार रुपयांना गॅस सिलेंडर खरेदी करावा लागत आहे.

Web Title : नागपुर में एलपीजी संकट: सरकारी दावे विफल, सिलेंडर के लिए तरस रहे नागरिक।

Web Summary : नागपुर एलपीजी सिलेंडर की भारी कमी से जूझ रहा है, जो सरकारी आश्वासनों के विपरीत है। निवासियों को 40 दिनों तक इंतजार करना पड़ रहा है, जिससे काला बाजार बढ़ रहा है। व्यावसायिक सिलेंडर ₹5,000 में बिक रहे हैं।

Web Title : Nagpur Faces LPG Shortage: Government Claims Fail, Citizens Await Cylinders.

Web Summary : Nagpur grapples with severe LPG cylinder scarcity, contradicting government assurances. Residents face 40-day waits, fueling black market prices. Commercial cylinders are sold for ₹5,000.