शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योतीचा योगाभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 7:57 PM

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात कमी उंचीचा मान पटकावलेल्या ज्योती आमगे हिने सीए रोडवरील आंबेडकर गार्डन येथे योगाभ्यास करून जागतिक योग दिनाचा संदेश दिला. यावेळी तिच्या सोबत आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे ही सुद्धा सहभागी झाली होती.

ठळक मुद्दे‘करा योग, रहा निरोग’ चा संदेश दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात कमी उंचीचा मान पटकावलेल्या ज्योती आमगे हिने सीए रोडवरील आंबेडकर गार्डन येथे योगाभ्यास करून जागतिक योग दिनाचा संदेश दिला. यावेळी तिच्या सोबत आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे ही सुद्धा सहभागी झाली होती. 

मन, शरीर, आत्मा, बुद्धी निरोगी ठेवण्यासाठी योग नियमित करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर योगाला मान्यता मिळाली असल्याने भारत सरकार २१ जूनला योगदिन साजरा करीत आहे. मानवाच्या आरोग्यासाठी योग महत्त्वाचा असल्याने तो प्रतिदिन करावा, यासाठी ज्योती आमगे हिने योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाभ्यास करून सर्वांनाच संदेश दिला. ज्योतीची उंची २ फूट ६ इंच आहे. तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. ज्योतीने बॉलिवूडच्या सिनेमातही काम केले आहे तर धनश्री सुद्धा आंतरराष्ट्रीय योगपटू असून, तिनेही नागपूरचे नाव सातासमुद्रापार पोहचविले आहे. धनश्रीने २०१३ पासून सलग एशियन योग चॅम्पियनशीप व वर्ल्ड योग चॅम्पियनशीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या दोघींनी एकत्र येऊन ‘करा योग, रहा निरोग’ असा संदेश दिला आहे.

टॅग्स :YogaयोगWomenमहिला