पबजी खेळताना भान हरपले; पंप हाउसमध्ये पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 10:58 IST2024-06-13T10:57:53+5:302024-06-13T10:58:15+5:30

Nagpur News: पहाटेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा पबजी खेळण्याच्या नादात दुर्दैवी मृत्यू झाला. अंबाझरी तलावाच्या पंप हाउसच्या होलमध्ये पडून तो बुडाला.

Lost consciousness while playing PUBG; Death by falling in pump house | पबजी खेळताना भान हरपले; पंप हाउसमध्ये पडून मृत्यू

पबजी खेळताना भान हरपले; पंप हाउसमध्ये पडून मृत्यू

 नागपूर -  पहाटेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा पबजी खेळण्याच्या नादात दुर्दैवी मृत्यू झाला. अंबाझरी तलावाच्या पंप हाउसच्या होलमध्ये पडून तो बुडाला. पुलकीत राज शहदादपुरी (१६) असे मृताचे नाव आहे. वाढदिवसादिवशीच त्याच्यावर हा दुर्दैवी मृत्यू ओढवला.

मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास राज हा त्याचा मित्र ऋषी खेमानी (१७) याच्यासोबत नाश्ता करण्यासाठी शंकरनगरला गेला होता. दुकान उघडायचे असल्याने आता काय करावे, या विचारातून ते टाइमपास करण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ पोहोचले. तेथील पंप हाउसजवळ बसून ते दोघेही पबजी हा मोबाइल गेम खेळू लागले. गेम खेळून झाल्यावर ते परत निघाले असता, पुलकीतला पंप हाउसचे होल दिसलेच नाही व तो त्यात पडला. तेथील पाण्यात तो बुडाला. ऋषीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत त्याला बाहेर काढले आणि इस्पितळात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Lost consciousness while playing PUBG; Death by falling in pump house