शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांनी दोघींचे दागिने लुटले

By admin | Updated: July 9, 2014 00:54 IST

तोतया पोलिसांनी अवघ्या पाऊण तासात सदर आणि लकडगंजमध्ये दोन महिलांना धाक दाखवून त्यांचे सव्वा लाखाचे दागिने लंपास केले.

नागपूर : तोतया पोलिसांनी अवघ्या पाऊण तासात सदर आणि लकडगंजमध्ये दोन महिलांना धाक दाखवून त्यांचे सव्वा लाखाचे दागिने लंपास केले.सदरमधील जैन मंदिर, बुध्दविहाराजवळ राहाणाऱ्या राधामनी बालकृष्ण मिनन (वय ४५) आज सकाळी ८.३० वाजता आपल्या कामावर जात होत्या. कराची गल्लीत दोन आरोपी त्यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत. असे अंगावर दागिने घालून जाणे धोकादायक आहे, असे सांगत त्यांनी मिनन यांना मंगळसूत्र काढून पुडीत बांधण्यास सांगितले. मिनन यांनी मंगळसूत्र गळ्यातून काढून रुमालात बांधत असताना आरोपीने ते ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. दुसरी घटना आज सकाळी ९.१५ ला वर्धमाननगरातील सुखसागर अपार्टमेंटसमोर घडली. मायादेवी कन्हैयालाल चूघ (वय ६८) प्रवचन ऐकून घरी जात होत्या. मोटरसायकलवरील दोन आरोपींनी त्यांना थांबवले. ‘आम्ही पोलीस आहोत.समोर चेकिंग सुरू आहे. अंगावर दागिने घालून जाऊ नका‘, असे सांगत या लुटारूंनी त्यांच्याजवळची अंगठी तसेच कानातील टॉप्स काढायला बाध्य केले. हे दागिने रुमालात बांधत असताना आरोपींनी हातचलाखी करून दागिने लंपास केले. या दोन्ही प्रकरणात अनुक्रमे सदर आणि लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात तोतया पोलिसांचा हैदोस सुरू असताना पोलीस मात्र मूग गिळून बसल्याचे जाणवत आहेत. वारंवार अशा घटना घडत असून, वृत्तपत्रातून त्याबाबत ठळकपणे वृत्त प्रकाशित होऊनही नागरिकही सतर्कता बाळगत नसल्याचे अनेक प्रकरणातून स्पष्ट होत आहे. असे लुटारू समोर आल्यास आरडाओरड केली तरी आपल्या किमती चिजवस्तू वाचविल्या जाऊ शकतात, नागरिकांनी तशी सतर्कता दाखवण्याची गरज पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)