शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या कारवाईकडे लक्ष

By admin | Updated: July 14, 2015 03:26 IST

उच्च शिक्षण सहसंचालकांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर प्राध्यापकांनी महाविद्यालयांमध्ये ६ तास ४० मिनिटे थांबलेच

नागपूर : उच्च शिक्षण सहसंचालकांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर प्राध्यापकांनी महाविद्यालयांमध्ये ६ तास ४० मिनिटे थांबलेच पाहिजे, असा मौखिक आदेश काही प्राचार्यांनी काढला आहे. परंतु मौखिक आदेशाला न जुमानण्याची भूमिका प्राध्यापक संघटनांनी घेतली आहे. राज्य शासनाविरोधात प्राध्यापकांची भूमिका कायम असून, या परिस्थितीत सहसंचालकांकडून खरोखरच वेतनकपात करण्यात येते का, याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.प्राध्यापक फारच कमी वेळ महाविद्यालयांत असल्याच्या बऱ्याच तक्रारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेऊन प्राध्यापक खरोखरच नियमांचे पालन करतात का, यासाठी विभागाने चाचपणी करण्याचे ठरविले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांनी वेळेचे नियम पाळणे आवश्यक असून, महाविद्यालयांना ‘बायोमेट्रिक मशीन’ लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर वेळेचे नियम पाळण्यात आले नाही तर, नियमांनुसार पगारकपात करण्याचा इशारा उच्च शिक्षण सहसंचालकांनी दिला आहे. दरम्यान, या धोरणाला प्राध्यापक संघटनांनी जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली आहे. विविध प्राध्यापक संघटनांनी जाहीरपणे सहसंचालकांचा निषेध केला; शिवाय काही संघटनांनी उच्च स्तरावर संपर्क केला आहे.प्राचार्यांच्या मौखिक आदेशाचे पालन न करण्याचे प्राध्यापक संघटनांनी सांगितले असल्यामुळे, आता सहसंचालकांकडून कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येते, याकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भात विभागीय सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)