शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नागपुरातन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून ...

नागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नागपुरातन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून मध्य प्रदेश व हैदराबादला जाणाऱ्या बसेस यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत.

गणेशपेठ बस आगराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, धुळे, औरंगाबाद, अकाेला, राजनांदगाव (छत्तीसगड), वाशीम या शहरात जाणाऱ्या बसेस ३० एप्रिलपर्यंत धावणार नाहीत. यामुळे या आगाराचे उत्पन्न खालावले आहे. दोन महिन्यापूर्वी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू असताना या आगारामधून सुटणाऱ्या बसेस रोज १७ हजार किलोमीटर अंतर धावायच्या. आता हा आकडा ७ हजार किलोमीटरवर आला आहे.

लांब पल्ल्याच्या बसेस बंद झाल्याने या आगाराला रोजचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. दरवर्षी एप्रिल, मे, जून हे महिने लग्नसराईचे असल्याने बसमध्ये प्रचंड गर्दी असायची. मुलांच्या शाळा संपल्याने परगावी जाणारे, देवदर्शन व पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी गर्दी असायची. मात्र कोरोना संक्रमणामुळे प्रवास मर्यादित झाला आहे. प्रवासी मिळत नसल्याने लांब पल्ल्याच्या बसेस बंद करण्याचा आणि फेऱ्या कमी करण्याचा निर्णय महामंडळाला घ्यावा लागत आहे. गणेशपेठ आगारातून लांब अंतराच्या ३५ बसेस धावायच्या. कमी अंतराच्या बसफेऱ्याही आता प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सोडल्या जात आहेत.