शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोमेश्वरमामालाही हवी 'जादू की झप्पी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 09:48 IST

मेयोच्या कोरोना वॉर्डात सेवा देणारे ‘लोमेश्वर मामा’ म्हणजे मकसूद भाईचे एक रूप. प्रामाणिकपणे सेवा देतानाच आपल्या हसमुख स्वभावाने बाधित रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम मामा करीत आहेत.

ठळक मुद्देकोरोना वॉर्डातील रुग्णांना देतात हसतमुख सेवा

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मुन्नाभाई एमएमबीबीएस’मधला मकसूद भाई आठवतो का? हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारा तो व्यक्ती ज्याला मुन्नाभाई पहिल्यांदा ‘जादू की झप्पी’ देतो. कोणत्याही क्षेत्रात वरिष्ठ श्रेणीच्या अधिकारी वर्गाच्या कामाची प्रशंसा होताना अशा मकसूद भाईसारख्यांचे योगदान दुर्लक्षित राहते. मेयोच्या कोरोना वॉर्डात सेवा देणारे ‘लोमेश्वर मामा’ म्हणजे मकसूद भाईचे एक रूप. प्रामाणिकपणे सेवा देतानाच आपल्या हसमुख स्वभावाने बाधित रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम मामा करीत आहेत.मेयो रुग्णालयात कक्ष सेवक (वॉर्ड अटेंडन्स) म्हणून सेवारत असलेले लोमेश्वर लक्षणे हे लोमेश्वर मामा म्हणून प्रसिद्ध. कोरोना वॉर्डात नियुक्ती झाली तेव्हा भीती व तक्रारीचा लवलेशही न ठेवता ते सेवेत रुजू झाले. डॉक्टर, नर्सेसच्या मदतीसाठी हा माणूस जेवढा तत्पर तेवढाच बाधित रुग्णांचे बेड लावणे, जेवण पुरविणे, औषधी देण्याचे काम करताना त्यांच्यातील सेवेचे हास्य कधी थांबत नाही. उलट स्वभावानुसार रुग्णांचे मनोरंजन करीत त्यांच्यावरील तणाव कमी करण्याचे समाधानाचे कार्य त्यांच्याकडून घडत आहे. म्हणूनच या वॉर्डात हा ‘मामू’ सर्वांचा प्रिय आहे.२६ कर्मचारी दोन महिन्यांपासून सेवेतमेयोच्या वॉर्ड क्रमांक ४, ५, ६, ७ व २४ मिळून कोरोना वॉर्ड तयार करण्यात आला असून त्यात २६ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून तीन शिफ्टमध्ये काम चालत असल्याचे स्वछता निरीक्षक मृणाल मेंढे यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांच्यात भीतीची भावना होती पण अंगावर सुरक्षा किट चढविणे किंवा काढणे आदींचे प्रशिक्षण दिल्यानंतर ते तयार झाले. गेल्या दोन महिन्यांपासून हे कर्मचारी सेवा देत असताना कोणतीही तक्रार आली नाही किंवा आरोग्याची समस्याही निर्माण झाली नाही. आता रुग्णसंख्या वाढत असली तरी हे सर्व मानसिकरीत्या भक्कम असल्याची ग्वाही मेंढे यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस