शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ‘रक्ताचं नातं’ मोहिमेचा धडाक्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत उमरेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तीत १३५ रक्तदात्यांनी रक्तदान करीत उदंड प्रतिसाद दिला. २ ते १५ जुलैदरम्यान ही महारक्तदानाची मोहीम राज्यभरात राबविली जात आहे.

उमरेड येथे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष देवरावजी इटनकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उदय महिला सेवा संस्था, श्री साईनाथ रक्तपेढी, महात्मे नेत्र रुग्णालय आणि ‌‘लोकमत’च्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्या गेले. स्व. देवरावजी इटनकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडलेल्या या शिबिरात ७६९ जणांची नेत्रतपासणीसुद्धा केल्या गेली. यापैकी १८६ लोकांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूरला पाठविले जाणार आहे.

यावेळी नागपूर जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. राजू पारवे, पालिकेचे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पौनीकर, माजी नगराध्यक्षा सुमन इटनकर, माजी नगरसेवक सूरज इटनकर, नगरसेवक सुरेश चिचमलकर, विशाल देशमुख, नगरसेविका योगिता इटनकर, रंजना बारेकर, जिल्हा संघटन सचिव मधुकर लांजेवार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, कांचन रेवतकर, रितेश राऊत, मंगेश गिरडकर, अमित लाडेकर, राकेश नौकरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

लोकमत ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. स्व. देवरावजी इटनकर यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण केल्या गेले. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोविड चाचणीसुद्धा केल्या गेली. रक्तदात्यांना उदय महिला सेवा संस्थेच्या वतीने नि:शुल्क हेल्मेट भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज इटनकर यांनी केले. संचालन प्रशांत गिरडकर यांनी केले. आभार संजय गायकवाड यांनी मानले.

-- लोकमत ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरात उपस्थित नागपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे आणि इतर.